वहाळ, नवनाथ काशिनाथ

नवनाथ काशिनाथ वहाळ हे शिक्षक, समाजसेवक, विचारवंत व महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले गाढे अभ्यासक अशा विविध भुमिकांमध्ये सारख्याच तन्मयतेने व तज्ञपणे वावरणारे, एक चार चौघांपेक्षा वेगळे वाटणारे व्यक्तिमत्व आहे. इतिहास हा अगदी लहानपणापासुन त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता व या इतिहासाला गौरवशाली पराक्रमांची व अंगावर रोमांच उभे करणार्‍या लढायांची झालर प्राप्त करून देणार्‍या सुभेदार मल्हारराव, अहिल्याबाई व वीरभैरवी होळकर आदी सेनानिंशी त्यांच्या मनाच्या तारा केव्हाच जोडल्या गेल्या होत्या.
[…]