देशपांडे, प्रवीण केशव

गेली सुमारे २७-२८ वर्षे प्रवीण देशपांडे छाछायाचित्रणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. छायाचित्रकला हे साध्य नव्हे तर साधन समजून विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांशी निगडीत आहेत.
[…]

कारळे, शिरीष

२७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांची छायाचित्रण क्षेत्रातील हुकुमत सांगून जातो. जे.जे. कलामहाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते आणि गेली २७ वर्षांत त्यांनी काळाप्रमाणेच पुढे पुढे जात आपला छायाचित्रण क्षेत्रातला आलेख उंचावला आहे. त्यांचं नाव शिरीष कारळे!
[…]

शिंदे, श्रीया

ठाण्यातील पत्रकार या नात्याने श्रीया शिंदे यांनी एक नविन उपक्रम सुरु करुन ठाण्यातील माता आणि बालकांचे छायाचित्रण केले व ह्या छायाचित्रणाला नवीन दिशा केली आहे.
[…]

जोशी, विजय सखाराम

गेली ३० वर्षं ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र “दै. सन्मित्र” चा कारभार पाहणारे विजय जोशी यांनी ७ वर्षं ठाणे सन्मित्र हे व्हिडिओ वार्तापत्रही चालवलं. तसंच “ठाणे समाचार” हे इंग्रजी वृत्तपत्र देखील १ वर्ष चालवलं.
[…]

समीरा गुजर-जोशी

मराठी मालिका आणि सन्मान सोहळ्यात दिसणारा एक चेहरा आपणा सर्वांच्याच ओळखीचा आहे. आपल्या निवेदनाने आणि अभिनयाने तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे संस्कृत भाषेतील प्रभुत्वामुळे सर्व श्रोत्यांना भुरळ घालणारी समीरा गुजर-जोशी ही देखील ठाण्यातलं एक रत्नच!
[…]

हिंगणे, शिरीष वामन

लेखन आणि बुद्धीबळ ह्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणारे ठाण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे श्री. शिरीष वामन हिंगणे. “काय पाहिलस माझ्यात?”, “गंगुबाई नॉनमॅट्रीक” ह्या व अशा अनेक मालीकांत एपिसोड लेखन त्यांनी केले.
[…]

गडवाल, (डॉ.) व्यंकटराव

वैद्यक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन ठाण्याचे मानबिंदु ठरलेले डॉ. गडवाल हे ठाण्यातलं एक यशस्वी व्यक्तिमत्व! डॉ. गडवाल यांनी “बॉटॅनिकल रॉ मटेरियल” समजल्या जाणार्‍या “सोनामल वायरम” या वृक्षाच्या जंगली प्रजातीमधून तयार होणारी “सोनालम क्रॉप” ही औषधी वनस्पती जगासमोर आणली.
[…]

जोगळेकर-कुलकर्णी, संपदा

मुंबई विद्यापीठातून एम.ए. ही पदवी संपादित केलेल्या संपदा जोगळेकर ह्या सध्या पुणे विद्यापीठात पी.एच.डी. करत आहेत. त्यांनी आपले शिक्षण मो.ह. विद्यालय व जोशी बेडेकर महाविद्यालय येथून पूर्ण केले. संपदा जोगळेकर यांनी आजपर्यंत १५ दूरदर्शन मालिका, पाच दैनंदिन मालिकातसेच “शर्यत”व “उदय” या दोन चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. […]

लाटकर, शिरीष दत्तात्रय

“पवित्र रिश्ता”, “बडे अच्छे लगते है”, सहित सहा हिंदी आणि अठरा मराठी मालिकांचे लेखन करणारे गिरीष लाटकर हे ठाण्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल आणि त्यानंतर बेडेकर महाविद्यालयातून लाटकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असतानाच एकांकिका स्पर्धांतून अभिनेता म्हणून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केले. 
[…]

बोरकर, संजय लक्ष्मण

अभिनय दिग्दर्शन, लेखन, डबींग, नेपथ्य व प्रकाश योजना ह्या आणि अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे संजय बोरकर ह्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयातून एकांकिका स्पर्धांमधून झाली. […]

1 5 6 7 8 9 17