संत रामदासस्वामी (समर्थ रामदास)

Sant Samartha Ramdas Swami

जन्म : चैत्र शु. नवमी (रामनवमी) शके १५३० (सन १६०८), ग्राम जांब (मराठवाड्यातील वर्तमान जालना जिल्हा)

वयाच्या आठव्या वर्षी पितृशोक, बाराव्या वर्षी मातेद्वारे लग्न करवून गृहस्थाश्रमात अडकवण्याची तयारी होताच गृहत्याग आणि पुढील सर्व जीवन वैराग्यपूर्ण संन्यस्त वृत्तीने.

प्रारम्भीच्या काळात नाशिकजवळ पंचवटी व टाकळी तेथे १२ वर्षे तपश्चर्या. करुणाष्टके, मनाचे श्लोक आदि रचना याच काळातील. तदनंतर १२ वर्षांचा काळ परिव्रजन करत भारतभर तीर्थाटन.

महाराष्ट्रात ११ स्थानी श्रीमारुतीरायाच्या मूर्तींची स्थापना. मठस्थापना व विशाल शिष्यपरिकर. तत्पश्चात शिवथरघळीत राहून ७७५१ ओव्यांच्या बृहदाकार “दासबोध” ग्रंथाचे लेखन.

जनसामान्यांना रामभक्तिची शिकवण.

छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती संभाजीराजांशी प्रत्यक्ष संपर्क व प्रसंगानुसार त्यांना मार्गदर्शन केल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत.

सन १६८१ मध्ये माघी नवमीला महाप्रयाण.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*