प्रदीप वसंत नाईक

भारताचे माजी वायुदल प्रमुख

प्रदीप वसंत नाईक हे भारताचे एकोणीसावे वायुदल प्रमुख होते. अनेक सैनिकी कारवायांमध्ये व अतिरेक्यांच्या शोध मोहिमांमध्ये असाधारण अस शौर्य गाजवून आपल्या तिरंग्याची किर्ती अबाधीत राखल्यानंतर ते या सर्वोच्च पदावर आरूढ झाले. ही सर्व मराठी माणसांसाठी निश्चितच गौरवाची बाब आहे.

प्रदीप नाइकांचा जन्म २२ जुलै १९४९ रोजी नागपुरमध्ये झाला व ते भारतीय वायुदलामध्ये लढाऊ विमानांचे चालक म्हणून १९६९ मध्ये रूजु झाले. ते सैनिक स्कुल सातारा व राष्ट्रीय सुरक्षा दलाचे(खडकवासला)विद्यार्थी आहेत. त्यांच्या विमान सेवेमधील प्रदीर्घ कारकिर्दीचा आलेख जर आपण बघितला तर नक्कीच आपला उर अभिमानाने फुलून येईल. भारतीय वायुदलाने आजवर आयोजित केलेल्या अनेक धडाकेबाज कारवायांमध्ये प्रदिप नाईकांनी आपल्या कर्तुत्वाचा व पराक्रमचा विशेष ठसा उमटविला आहे. जवळजवळ तीन हजार तासांपेक्षा जास्त न थकता विमान चालविण्याचा घवघवीत विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. 1969 च्या भारत पाक रणधुमाळीमध्ये प्रदीप नाईकांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी प्राणापणाने खिंड लढवून शत्रूची पळता भुई थोडी केली होती. या संग्रामामुळे भारताची मान आंतरराष्ट्रीय वर्तुळात चांगलीच ताठ झाली. शेजारील राष्ट्राला आपल्या पराक्रमी मातीच पाणी चाखायला दिल्याबद्दल व शत्रुचा फौजफाटा भरपूर असून सुध्दा त्यांच्या डोळ्यांपुढे काजवे चमकवल्याबद्दल प्रदीप नाईकांना अतिविशिष्ठ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

# Pradip Vasant Naik
19th Chief of Air Force of India

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*