कामत, निशीकांत

निशीकांत कामत हा आजच्या तरूण पिढीचा दबलेला आवाज चित्रपटांद्वारे सगळ्यांपुढे मांडणारा एक नव्या व ताज्या दमाचा दिग्दर्शक. नव्या पिढीच्या आकांक्षाचं, स्वप्नांचं, व अपेक्षांचं प्रतिनिधीत्व करणारे असे त्याचे चित्रपट आजच्या दिग्दर्शकांच्या विशिष्ठ साच्यापेक्षा खुप वेगळे व आशयपुर्ण असतात. प्रेक्षकांच तीन तास निव्वळ मनोरंजन करण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावतील व समाजात वावरणार्‍या अपप्रवृत्तींविरोधात आवाज उठवायला लावतील असे चित्रपट बनवण्याकडे त्याचा कल असतो व त्याची ही वेगळी तर्‍हा व शैली प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे. सामान्य माणसाच्या राज्यकर्त्यांकडून असलेल्या रास्त अपेक्षा, रोजच्या जीवनात आपली होणारी घुसमट, नव्या पिढीच्या व जुन्या पिढी च्या मध्ये उभी असलेली अगदी विरुध्द विचारांची भिंत, जागतिकीकरणाच्या नादात तत्वांची, परंपरांची, व संस्कारांची होणारी फरफट अशा अनेक सामाजिक विषयांवर बोधक भाष्य करणारा, केवळ मराठीच नव्हे तर सर्व भारतीय तरूणांना आपल्या अंतर्मनाचा आवाज वाटणारा असा त्याचा चित्रपट असतो. म्हणुनच “डोंबिवली फास्ट” , “मुंबई मेरी जान” सारखे त्याचे चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरले. या दोन चित्रपटांना केवळ भरपुर व्यावसायिक यशच मिळालं नाही तर मायबाप प्रेक्षकांच प्रेम मिळालं, वाहवा मिळाली, मनापासून दाद मिळाली.

डोंबिवली फास्ट हा चित्रपट एवढा गाजला की तामिळ भाषेमधून “ईव्हानो ओरूव्हान” हा त्याचा रिमेक बनविला गेला. निशिकांत कामतने त्याच्या दिग्दर्शन कारकिर्दीची सुरूवात सातच्या आत घरात या आजच्या व मागच्या पिढींच्या विचारांमधील द्वंद्व दाखवणार्‍या चित्रपटाने केली. आजच्या तरूणाईने या चित्रपटाला खुप चांगला प्रतिसाद दिला. मर्यादा उल्लंघुन, वाहत्या वयाच्या सोबत वा ात जाऊन केलेल्या बेजबाबदार वर्तनामुळे कोणती भयानक परिस्थिती ओढवू शकते, ही सद्यस्थितीला पुरक असलेली थीम या चित्रपटाने प्रभावीपणे रंगविली होती.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*