मीनाक्षी शिरोडकर

अभिनेत्री

पहिली मराठमोळी स्वीमसुट गर्ल असे सुद्धा मीनाक्षी शिरोडकर यांना म्हणता येईल. त्यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९१६ रोजी झाला.

यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या का.. लाजता? असं म्हणत जलक्रीडा करणारी अभिनेत्री आठवते ना?

मीनाक्षी शिरोडकर यांनी १९३८ मध्ये ब्रम्हचारी चित्रपटात दिलेल्या या बोल्डसीनची चर्चा त्याकाळी रंगली नसती तरच नवल. स्वीमसूटमधील दृश्यामुळे मीनाक्षी यांना प्रचंड टीका सहन करावी लागली.

रेडिओपासून सुरुवात केलेल्या मीनाक्षी शिरोडकर यांनी कालांतराने चित्रपटात भूमिका स्वीकारल्या.

आचार्य अत्रेंनी त्यांचं ‘रतन’ हे नाव बदलून ‘मीनाक्षी’ केलं. अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर या त्यांच्या नाती आहेत.

मीनाक्षी शिरोडकर यांचे ३ जून १९९७ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

पुणे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*