वनमाला

अभिनेत्री

सुशीलादेवी पवार यांचे वडील बापूराव पवार ग्वाल्हेराचे संस्थानिक शिंदे यांच्या दरबारी सरदार होते. त्यांचा जन्म २२ मे १९१५ रोजी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे झाला.सुशीलादेवींनी बी.ए. पदवी मिळवली.

१९३० मध्ये व्ही शांताराम ह्यांच्या आग्रहाने त्या चित्रपट दुनियेत उतरल्या. आणि त्यांनी नाटकां-चित्रपटांत भूमिका करायला सुरुवात केली.नागभूषण नवकुमार आणि लच्छूमहाराज यांच्याकडून नृत्य, तर पं. सदाशिवराव अमृतफुले, चम्मनखाँ आणि गणपतराव देवासकर यांच्याकडून सुशीलादेवी हिंदुस्तानी गायकी शिकल्या होत्या.

कलेच्या आवडीमुळे त्यांनी कुटुंबीयांचा विरोध पत्करून चित्रपटक्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि १९४० सालातल्या लपंडाव चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९४१ सालच्या “सिकंदर” या चित्रपटाने त्यां हिंदी चित्रपटात आल्या. पुढील काळात त्यांनी वसंतसेना, बाईलवेडा, पायाची दासी इत्यादी मराठी चित्रपटांतून, तसेच आँखमिचौली, महाकवी कालिदास, हातिमताई, शरबती आँखे, परबत पे अपना डेरा इत्यादी हिंदी चित्रपटांतून अभिनय केला. साने गुरुजींनी लिहिलेल्या “श्यामची आई”वर प्र.के. अत्र्यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यात श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना १९५३ सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार लाभला.

वनमालाबाईंचे २९ मे २००७ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*