माधुरी दीक्षित

सुंदरता’, ‘नृत्य’ आणि ‘अभिनय’ यांचा सुरेख त्रिवेणी मिलाफ म्हणजे माधुरी दीक्षित. तिचा जन्म १५ मे १९६७ रोजी झाला. पूर्वाश्रमीची माधुरी शंकर दीक्षित आणि आजच्या माधुरी श्रीराम नेने.

माधुरी ही ख-या अर्थाने सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांचा अभूतपूर्व एकत्रित संगम आहे. तिच्या आधीच्या सर्व सुपरस्टार या कुठे ना कुठे कमी होत्या. अपवाद फक्त रेखाचा. मधुबालाला नृत्यात मास्टरी नव्हती तर हेमा मालिनी सौंदर्यवती असली तरी अभिनयात डावी होती.

माधुरी दीक्षित यांनी १७ वर्षांची असताना पहिला चित्रपट राजश्री प्राँडक्शनचा ‘अबोध’ केला. ‘अबोध’ कुणी फारसा पाहिला नाही. पुढे माधुरी दीक्षित यांनी ‘मोहरे’, ‘मानवहत्या’ असे ‘बी’ ग्रेडचे चित्रपट केले. मीनाक्षी शेषाद्री प्रमुख भुमिकेमध्ये असतांना ‘स्वाती’ आणि ‘आवाराबाप’ या चित्रपटांमध्ये माधुरी यांनी सहाय्यक भूमिका केल्या. ‘उत्तर दक्षिण’ हा माधुरी दीक्षित यांचा पहिला व्यावसायिक चित्रपट.

नंबर १ च्या पदावर विराजमान होणारी माधुरी ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली. जे निर्माते तिला ‘फिजीक’ नाही असे म्हणायचे त्यांनाच तिच्यात कमालीचे ‘सेक्स अपील’ दिसू लागले. तिच्या दिलखेचक अदांनी तर संपूर्ण सिनेसृष्टीला दिवाणे केले. तिची ‘हम आपके है कौन’ मधील काम कमालीचे हिट ठरले. माधुरीच्या नावाचे ‘गाणे’ (माधुरी दीक्षित मिली रस्ते में..) आणि ‘चित्रपट’ (मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ) देखील आले. तिने २ चित्रपटात (धारावी, बड़े मियां छोटे मियां) ‘माधुरी दीक्षित’चीच भूमिका केली.

अनिल-माधुरीच्या जोडीने त्याकाळी `तेजाब`, परिंदा`, `राम-लखन`, `किशन कन्हैया`, `जीवन एक संघर्ष`, `जमाई राजा`, `खेल` `बेटा`, `जिंदगी एक जुआ`, `राजकुमार`, `पुकार` हे हिट सिनेमे केले. त्यांनी केलेल्या जवळपास ५७ चित्रपटांपैकी १६ चित्रपटांतील भूमिकांसाठी त्यांना निरनिराळ्या पुरस्कारांसाठी ‘नामांकन’ मिळाले, तर ५ वेळा त्यांनी प्रतिष्ठेचा ‘फिल्म फेअर’ पुरस्कार दिल, बेटा, हम आपके हैं कौन, दिल तो पागल है, देवदास या चित्रपटांसाठी पटकावला. ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटानंतर तर माधुरी दीक्षित या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या.

संजयच्या आयुष्यात माधुरी येण्याआधी त्याचे लग्न झालेले होते. आज माधुरी दीक्षित या अमेरिकेमध्ये अनेकवर्षे स्थायिक होऊन देखील आपल्या दोन मुलांना पाश्चिमात्य संस्कृती ऐवजी भारतीय संस्कृतीत वाढवत आहे. लग्नानंतर माधुरी दीक्षित यांनी `गुलाब गॅंग` आणि `डेढ़ इश्किया` या सिनेमातून कमबॅक केले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*