माधवी गोगटे

ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी झाला.

माधवी गोगटे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली, त्यांनी १९८७ साली ‘सूत्रधार’ चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये प्रवेश केला. १९९० मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती. ‘घनचक्कर’या मराठी चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली.

माधवी गोगटे यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.  ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती.

माधवी गोगटे यांच्या हिंदी मालिका ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकेत झळकल्या. सोबतच “तुझं माझं जमतंय” या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*