गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव

गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव यांचा जन्म ३१ डिसेंबर १८७८ रोजी बडोदे येथे झाला.

वस्ताद जुम्मादादांचे शिष्य व अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणा-या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्येही त्यांनी गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. लाठी, लेझीम, फरीगदगा, लकडी, बनेटी, जोडी, असे देशी खेळ व व्यायाम प्रकारांचे शास्त्र निर्माण करून त्यांना सांघिक व्यायामाचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे काम माणिकरावांनी केले.

बडोद्याच्या ‘लक्ष्मीविलास’ राजवाडय़ात भव्य शस्त्रसंग्रहालय उभारणा-या माणिकरावांनी ‘प्रतापशस्त्रागार’, ‘भारतीय व्यायाम’ हे ग्रंथ लिहिले.

गजानन यशवंत माणिक यांचे २५ मे १९५४ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*