डॉ. मोहन भागवत (सरसंघचालक)

RSS सरसंघचालक

मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात तरुण सरसंघचालकांपैकी आहेत. मोहन भागवत हे पेशाने पशुवैद्य आहेत.

मूळच्या चंद्रपूरच्या असणाऱ्या भागवतांचा जन्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघात क्रियाशील असणाऱ्या एका कुटुंबात ११ सप्टेंबर १९५० रोजी झाला. त्यांचे वडील मधुकर भागवत, हे आर.एस.एस.च्या चंद्रपूर विभागाचे अध्यक्ष होते. त्या आधी त्यांनी गुजरातेत प्रांत प्रचारक म्हणूनही काम केले होते. मधुकर भागवतांनी लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणले.

मोहन भागवत हे २००९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले आहेत. ते ब्रह्मचारी आहेत व त्यांनी भारत व विदेशात भरपूर भ्रमण केले आहे. ते स्पष्टवक्ते, आशावादी व पक्षीय राजकारणांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघास दूर ठेवण्याची स्पष्ट दृष्टी असणारे असे समजले जातात.

भागवत यांचा हिंदुत्वाचा प्रचार करण्यात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न आहे.त्यांनी, उच्च व जुन्या भारतीय मूल्यांवर संघाचा पाया मजबूत ठेवून बदलत्या काळासोबत जाण्यावर जोर दिला.ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जुने समज व चालीरीतींना चिकटून असतो या प्रसिद्ध समजाविरुद्ध देशातील लोकांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आधुनिकता स्वीकारून त्यासोबत वाटचाल करीत आहे. हिंदू समाजात असलेल्या जातींच्या असमानतेच्या प्रश्नावर भागवत यांनी ‘अस्पृश्यतेस थारा नको’ असे विधान केले आहे. ते असेही म्हणाले की, ‘विविधतेत एकता’ या तत्त्वावर आधारित असलेल्या हिंदू समाजाने स्वतःच्याच जातभाईंशी जातिभेद करण्याच्या पूर्वापारच्या प्रथेकडे लक्ष वेधून अश्या भेदभावपूर्ण प्रवृत्ती हटविण्यासाठी पुढाकार घ्यावयास हवा व याची सुरुवात प्रत्येक हिंदू घरातून व्हावयास हवी.

अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा

https://www.marathisrushti.com/articles/sarsanghachalak-dr-mohan-bhagwat/

# Mohan Bhagwat

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*