काजोल

अभिनेत्री

सध्याच्या काळात आघाडीच्या आणि नामांकित अभिनेत्रींमध्ये समावेश होत असलेल्या काजोलने शाळेत शिकत असतांना ‘बेखुदी’हा चित्रपट केला. काजोलने ‘बेखुदी’ या चित्रपटाच्या माध्यामातून जेव्हा बॉलीवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा तिच्या पदरी पडली साफ निराशा. काजोल दिसायला सर्वसामान्य तरुणींसारखीच सामान्य. पण ‘बाजीगर’मध्ये नवख्या शाहरुख सोबत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत तिने बॉलीवूडमधले आपले स्थान पक्के केलेच. या जोडीने नंतर मग अनेक हीट चित्रपट दिले.

त्यानंतर तिने शाहरूख सोबत करण – अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है आणि कभी खुशी कभी गम यारखे अनेक हीट चित्रपट केले. त्या‍तील ‘दिलवाले…’ मध्ये आजही जोरदार गर्दी खेचण्याची क्षमता आहे. या चित्रपटानेच तिला पहिल्यांदा उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कारही मिळवून दिला.

काजोल आणि अजय देवगन यांनी १९९९ मध्ये लग्न केले.

काजोलच्या नावावर आतापर्यंत उत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड्स आहेत. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळाले. तर तिसरा फिल्म फेअर पुरस्कार ही पटकाविला.

अधिक माहितीकरिता खालील लेख वाचा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*