समाजाच्या हितासाठी झटणार्‍या मराठी सामाजिक कार्यकर्त्याची माहिती

भावे, पुष्पा

एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्‍या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ सालचा. पूर्वाश्रमीच्या त्या सरकार घराण्यातील. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत.
[…]

सावित्रीबाई फुले

उपेक्षित स्त्रियांचे शिक्षण व स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार आणि अनिष्ठ रूढी विरोधात अखंड संघर्ष करणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, दलितांचे उद्धारक व सत्यशोधक समाजाचे नेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्या धर्मपत्नी. १८४० साली त्यांच्या वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचा ज्योतिबांशी विवाह झाला.
[…]

पै, नाथ ((बॅरिस्टर नाथ पै)

अतिशय विद्वान आणि गोरगरिबांविषयी आत्मीयता असलेले बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म वेंगुर्ले येथे दि. २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि अंगी ज्ञानलालसा असल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. […]

मुरलीधर देविदास आमटे (बाबा आमटे)

समाजसुधारक, विचारवंत, कवी आणि कुष्ठरोग निर्मूलनाचे अफाट काम उभारणारे एक भारतीय व्यक्तिमत्त्व म्हणजे मुरलीधर देविदास आमटे तथा बाबा आमटे. १९५२ साली वरोडयाजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. […]

शिदे, विठ्ठल रामजी

‘ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि सर्व चळवळींना नैतिक अधिष्ठान असले पाहिजे’ असे उदात्त विचार आणि तपस्वी जीवनाचा पुरस्कार करणारे विठ्ठल रामजी तथा महर्षी अण्णासाहेब शिदे. जमखिडी येथील एका धार्मिक कुटुंबात १८७३ ला अण्णासाहेब शिद्यांचा जन्म झाला.
[…]

डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस

भारत व चीन या दोन देशांमध्ये मैत्रीचे ऋणानुबंध निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसर्‍या चीन जपान युध्दाच्या पार्श्वभूमीवर, भारताने चीनमध्ये आपत्ग्रस्त वैद्यकीय सुविधेसाठी पाठविलेल्या ५ वैद्यकीय तज्ञांपैकी ते एक होते. अचूक वैद्यकिय कौशल्ये, प्रसंगवधानी स्वभाव, व असामान्य नेत्तृत्वगुणांमुळे कित्येक जखमी चिनी नागरिकांन व सैनिकांना पुनर्जीवन मिळाले होते. […]

1 13 14 15