ग्रामपंचायतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत पोहचलेल्या नेत्यांची माहिती

गोखले, गोपाळकृष्ण

भारतातील सनदशीर चळवळीचे प्रणेते म्हणून नाव घेतलं जातं ते गोपाळकृष्ण गोखले यांचं. गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी कोकणातील चिपळूण तालुक्यातील कोतळुक या गावी झाला.
[…]

गायकवाड, सयाजीराव (महाराजा)

महाराजा सयाजीराव गायकवाड या नावाने ओळखले जाणारे प्रजाहितदक्ष, आदर्श असे नरेश. पूर्वाश्रमीचे ते गोपाळ काशीराम गायकवाड. अतिशय गरीब घरातला एक हुशार, चुणचुणीत मुलगा. १० मार्च १८६३ रोजी नाशिक जिल्ह्यातील कवणाणे येथे त्यांचा जन्म झाला.
[…]

पै, नाथ ((बॅरिस्टर नाथ पै)

अतिशय विद्वान आणि गोरगरिबांविषयी आत्मीयता असलेले बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म वेंगुर्ले येथे दि. २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि अंगी ज्ञानलालसा असल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. […]

मधू लिमये

अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, राज्यघटना, सामाजिक व राष्ट्रीय समस्या इ. चा व्यासंग असलेले विचारवंत राजकीय नेते मधु लिमये यांचा जन्म पुणे येथे १ मे १९२२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचा शिक्षकी पेशा होता. नोकरी निमित्त अनेक गावी जावे लागत असल्याने मधू लिमये यांचे शिक्षण त्यांच्या आजोळी पुण्यातच झाले. १९३७ साली मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. […]

अणे, माधव श्रीहरी (लोकनायक बापूजी अणे)

विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे. ह्यांचा जन्म २९ ऑगस्ट १८८० साली झाला. त्यांच्या घराण्याचे मूळ नाव वणी. त्यांचे आजोबा हे वैदिकी होते. त्याचे लहानपणापासूनच संस्कार अणे यांच्यावर झाले. […]

प्रतिभाताई पाटील

काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असणार्‍या श्रीमती प्रतिभाताई देवीसिह पाटील २५ जुलै २००७ ते २५ जुलै २०१२ या दरम्यान भारताच्या राष्ट्राध्यक्षा होत्या.
[…]

यशवंतराव चव्हाण

इंग्रजी चौथीचा वर्ग. जाणिवेचे आकलन नुकतेच व्हायला लागले होते. आयुष्यातील आकांक्षा, महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटू लागले होते. एक दिवस वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, ‘‘तू कोण होणार रे ?’’ प्रत्येक विद्यार्थी उठून उत्तर देत होता. कोणी सांगितलं, ‘‘टिळक’’ कोणी ‘‘डॉक्टर’’ तर कोणी ‘‘कवी’’ पण त्यात एक मुलगा म्हणाला, ‘‘मी यशवंतराव होणार !’’आत्मविश्वासाची, आत्मप्रत्ययाची जाणीव इतक्या लहान वयात ज्यांना झाली होती ते यशवंतराव चव्हाण !
[…]

1 12 13 14