मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

यज्ञोपावित, किरण

किरण यज्ञोपावित हा मराठीमधील ताज्या दमाचा दिग्दर्शक आहे., व तजेलदार चित्रपटांद्वारे रसिकांचे निखळ मनोरंजन करून काही लोकांच्या जीवनातील जळजळीत वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही त्याची शैली आज मराठी रसिकांच्या मनाला चांगलीच भिडलेली दिसते. चिंचवडमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या किरणला लहानपणापासूनच नाटक बघण्याची विलक्षण आवड होती. तरूणपणी प्रायोगिक रंगभुमीमध्ये चपखल बसणार्‍या अनेक चित्रपट, नाटके, लघुनाटके, व छोट्या मोठ्या जाग्रुतीपर स्किट्ससाठी संहितालेखनाचे काम त्याने केले होते.
[…]

मुळ्ये, अभिजीत

आरोग्यविषयक विपुल व वैविध्यपुर्ण लेखन करून अनेक कौटुंबिक जोडप्यांच्या जीवनांमध्ये लक्षवेधी सुधारणा करणार्‍या निवडक काही तरूण पत्रकारांमध्ये अभिजीत मुळ्ये यांचे नाव घेता येईल. पत्रकारितेच्या आपल्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी विवीध पदांवर व विभीन्न जबाबदार्‍यांवर आवडीने काम केले, असले तरी आरोग्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेभोवती फिरणार्‍या घटकांवर माहितीपर लेखन करणे हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा प्रांत आहे. लहान असताना प्रत्येक गोष्टींवर चौफेर विचार करणार्‍या अभिजीत यांनी आपल्यातल्या जिज्ञासु पत्रकाराला अवांतर वाचनाद्वारे व सुक्ष्म निरीक्षण शक्तीद्वारे आकार दिलेला होता.
[…]

भंडारी, अमित

अमित भंडारी हा स्टार माझा या मराठीमधील सध्या सर्वात आघाडीवरच्या वृत्तवाहिनीवर दररोज झळकणारा एक लोकप्रिय पत्रकार आहे. दिलखुलास गप्पा मारून समोरची व्यक्ती कितीही छोटी किंवा मोठी का असेना, तिला बोलतं करण्याची कला अमितला उत्तमरित्या जमते. आजवर अनेक मराठी व हिंदी भाषेशी जोडले गेलेले कलाकार, व्यावसायिक, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंफल्या गेलेल्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखती त्याने सारख्याच सहजतेने व त्याच्या मिश्कील शैलीमध्ये घेतल्या आहेत.
[…]

नारळीकर, (डॉ.) जयंत विष्णू

जयंत नारळीकर हे त्यांच्या रोचक, रसदार, व सर्वांच्या मनाला भिडेल अशा लेखनशैलीत आकाशातील गुढ तारे व ग्रहांच्या गोष्टी सांगणारे लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. अनेक वैचारिक, वैज्ञानिक, तांत्रिक, काही समजायला सोप्या व काही तर लहान मुलांनाही वाचायला उपयुक्त अशा कथांमधून ते आपल्या सर्वांशी हितगुज साधत असतात.
[…]

कोसंबी, दामोदर धर्मानंद (डीडी)

असं म्हणतात की देवाने माणसाला काही विशीष्ठ विषयांमध्ये गती दिलेली आहे, व काहींमध्ये अधोगती. परंतु काही हिरे असे असतात, की जीवनातील अनेक क्षेत्रे व नाण्याच्या दोन्ही बाजू उत्तमपणे हाताळण्याची कला त्यांना उत्तम अवगत असते. एकाच गोष्टीला प्राधान्य द्यावे किंवा एकाच क्षेत्रात पुर्णपणे बुडून, त्यात भव्य दिव्य असे काहीतरी मिळवावे असली तत्वे त्यांना कधीच रूचत नाहीत. जीवनाच्या विवीधांगी विचारधारांमधे, मतप्रवाहांमधे, किंवा कलाकौशल्यांमधे सतत डुबकी मारण्याचा त्यांचा स्वभावच असतो व त्यांच्यासमोर पसरलेल्या विभीन्न व्यावसायिक, तांत्रिक, माहिती, संशोधन, कला, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांच्या जाळ्यामध्ये ते तितक्याच तन्मयतेने व आत्मीयतेने काम करीत असतात. अशाच एका अत्यंत चळवळ्या व विज्ञानाच्या विवीध वाटा कोळून प्यायलेल्या संशोधकाचे नाव म्हणजे दामोदर कोसांबी.
[…]

सदानी, हरीष

स्त्रियांच्या प्रश्नांविषयी अनेक स्त्री संघटना काम करताना दिसतात. पुरुषांनाही स्त्रियांपासून कायद्याने संरक्षण देण्यासाठी सध्या दबावगट तयार होतो आहे. मात्र या परिस्थितीत स्त्रियांच्या संरक्षणासाठी व त्यांचा आत्मसन्मान अबाधित ठेवण्यासाठी पुरुषांनी तयार केलेली मावा (मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अ‍ॅब्युज) ही संस्था अपवादात्मक ठरावी. एकमेकांचा आदर करीत, व एकामेकांबद्दलचा विश्वास वृध्दिंगत करून स्त्री-पुरुषांना सहजीवन जगता यावे यासाठी अंधेरीतील ही संस्था काम करते. विश्वस्त म्हणून या संस्थेचे काम करणार्‍या हरीष सदानी यांना महाराष्ट्र फाउण्डेशनने पुरस्कार देऊन त्यांच्या सेवेला गौरविले आहे.
[…]

मनोहर, (डॉ.) प्रियदर्शन

डॉक्टर प्रियदर्शन मनोहर हे एक प्रतिभावंत मराठी लेखक आहेत. त्यांच वास्तव्य हे परदेशात असून सध्या ते मराठी मंडळ या पिटसबर्ग या संस्थेसाठी लेखक म्हणुन काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या विपुल लेखनाला अमाप प्रसिध्दी मिळाली असून त्यांच्याभोवती गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिध्दीच एक वलयच निर्माण झालय. सातासमुद्रापल्याड, मराठीचा कलात्मक तसेच वैचारिक प्रसार व प्रचार करणारा हा गुणी कलाकार, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या वेगळ्या व स्वतंत्र लेखनशैलीची रसिकांवर छाप पाडण्यात विलक्षण यशस्वी ठरला आहे लघुकथा हा जरी प्रियदर्शनांचा आवडता प्रांत असला तरी सांगितीक नाटकांच्या लेखना व सादरीकरणापासून ते विनोदी, मनोरंजन कथा लिहीण्यापर्यन्त सार्‍याच गोष्टी त्यांना उत्तम जमतात. संसार व्हर्जन 2 हा त्यांनी सादर केलेला अतिशय रंजक असा सांगितीक एकपात्री प्रयोग चांगलाच गाजला. त्यांनी लिहीलेल बहुतांशी साहित्य हे मराठी मंडळातर्फेच प्रकाशित केल जात. त्यांच्यामधील अष्टपैलु, काहीसा भावनाप्रधान पण तेवढाच मिश्कील असा लेखक वाचकांमध्ये चांगलाच रूजला असून त्यांच्या यशाच हेच तर गमक आहे.
[…]

भवाळकर, (डॉ.) तारा

लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांचं वर्णन ‘माय’वाटेवरची प्रवासिनी असंच करावं लागेल. कारण ‘लोकसंस्कृती’ ही व्यापक अर्थाने ‘माय’ म्हणजेच ‘मातृपरंपरा’ असल्याचं त्यांनी आपल्या लेखनातून वारंवार सिद्ध केलं आहे. ताराबाईंचं आजवरचं लोकसाहित्यविषयक लेखन वाचल्यावर महाराष्ट्रीय किंवा एकूणच भारतीय स्त्रीमन नव्यानं उलगडतं. बाईंनी लोकसाहित्याचे संशोधन करताना संकलित केलेल्या लोकगीत-लोककथांचा अन्वय लावून त्यांनी या सार्‍यांची सैध्दंतिक मांडणी करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच त्यांना मिळालेली ‘महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळा’ची सन्मानवृत्ती योग्यच आहे. […]

घोगळे, अनंत

अभिनयापासून नाट्यस्पर्धांच्या आयोजनापर्यंत अनेक भूमिकांत रमणारे अनंत घोगळे हे एक वल्ली आहेत. नाट्यचळवळीची गौरवशाली परंपरा अखंड सुरू राहावी म्हणून अनेकजण धडपडत असतात. काही पडद्या समोर तर काही मागे! जे सतत प्रकाश- झोतात असतातत्यांना प्रसिद्धीचं वलय लाभतं, पडद्या-मागचे कलाकारांच योग्दान मात्र दुर्लक्षितच राहतं. ‘औट घटकेच्या’ या नाट्यावकाशात काही मंडळींनी ही तफावत मनोमन स्वीकारलेली असते. त्यांच्या दृष्टीने नाट्यसेवा हे एक प्रकारचं व्रत असतं. घेतला वसा टाकणार कसा, असाच त्यांचा बाणा असतो.
[…]

बांदेकर, प्रवीण

गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक-राजकीय बदलांचा आडवा-उभा वेध घेणारी प्रवीण बांदेकर यांची ‘चाळेगत’ ही कादंबरी कोकणातील सद्यस्थितीची हुबेहूब सावली ठरली आहे. आधी ‘विभावरी पाटील’ आणि आता सोलापूरचा मानाचा ‘भैरुरतन दमाणी’ पुरस्कार मिळवून बांदेकरांच्या या कादंबरीने समकालातील आपलं वेगळेपण अधोरेखित केलं आहे. अर्थात हे वेगळेपण केवळ कादंबरीच्या विषयात नाही, तिच्या मांडणीतही आहे. लेखकाने स्वत:शीच बोलावं, किंवा दशावतारातील शंकासुराने कथा सांगावी, असा कादंबरीचा साचा आहे आणि हा साचा कोकणातल्या मातीतूनच त्यांच्यात रुजलेला आहे. कारण बांदा-सावंतवाडीचं तळकोकण हीच बांदेकरांची जन्मभूमी, कर्मभूमीही आणि स्वप्नभूमीही. त्यामुळेच या स्वप्नभूमीत गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांनी (अर्थात वाईट बदलांनी) त्यांचं मन हळहळलं नसतं, तरच नवल होतं! ‘चाळेगत’ ही प्रवीण बांदेकर यांची पहिलीच कादंबरी!
[…]

1 40 41 42 43 44 57