मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

वासुदेव गोविंद आपटे

ते मराठीतील एक संपादक, बाल वाड्गमयकार आणि कोशकामकार होते. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1871 रोजी जळगाव जिल्हयातील धरणगाव येथे. शिक्षण धुळे, इंदूर आणि नागपूर येथे. कलकत्ता विद्यापीठातून ते बी.ए.झाले (1893). बंगाली भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. अध्यापन […]

सुर्वे, नारायण गंगाराम

नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील दलित व उपेक्षित वर्गामध्ये राहणार्‍या, व असंख्य वेदना निमुटपणे सोसणार्‍या जनतेचे आयुष्यभर अगदी समर्थपणे प्रतिनिधीत्व केले. […]

वैद्य, वसंत रामकृष्ण

वसंत वैद्य प्रकाशझोतात आले ते त्यांच्या खुमासदार लेखनशैलीमुळे. प्रयोगशील लेखकाप्रमाणे एक अत्यंत हळव्या मनाचे व सृजनशील कवी म्हणूनही ते रसिकांच्या आठवणींमध्ये मिसळून गेले. […]

पवार, उर्मिला

ग्रामीण भाषा व आपल्या अंगणाबाहेरचे जग न अनुभवता देखील स्वत:च्या लेखणीने परिपुर्णता व प्रगल्भतेचा सुरेल संगम साधलेला दिसतो अश्या साहित्यिक म्हणजे उर्मीला पवार. त्यांचा जन्म ७ मे १९४५ रोजी झाला. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपले बालपण […]

देशमुख, रा.जे

स्वयंभू प्रकाशन संस्थेचे रा.जे. देशमुख हे संस्थापक आहेत. त्यांची प्रकाशन पध्दत ही त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच अनोखी अशी आहे. वि.स.खांडेकर, रणजित देसाई यांच्यासारख्या ख्यातनाम लेखकांची आपल्या पुण्यातल्या गढावर राहण्याची व्यवस्था करून, खांडेकरांकडून “ययाती”, आणि रणजित देसाईंकडून, “स्वामी” […]

सारंग, विलास

११ जून १९४२ रोजी कारवार येथे जन्मलेल्या विलास सारंग यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. इंग्रजी विषयात एम्.ए, तसेच डब्ल्यू. एच्. ऑडन या इंग्रजी कवीवरील प्रबंधलेखनासाठी मुंबई विद्यापीठाची १९६९ साली पीएच्. डी. आणि अमेरिकेतील इंडियाना […]

भोसले, शंकर दत्तात्रय

विनोदाची झालर व हास्याचे कल्लोळ तसंच आपल्या कवितांमधून रसिकांना अंतर्मुख करायला लावणारे कवी म्हणजे शंकर दत्तात्रय भोसले हे होते. “बाहेरचा वारा”, “गालावरचे गुलाब”, “जवानीचे विमान”, “स्वप्नातील चुंबन”, “चटक चांदण्या” अश्या अनेक विनोदी, संवादात्मक, व मिश्कील […]

रामदास भटकळ

पाप्युलर या मराठी साहित्यविश्वामधील अग्रणी समजल्या जाणार्‍या पुस्तक प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ हे संस्थापक आहेत. रामदास भटकळ यांचा जन्म ५ जानेवारी १९३५साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल, तर एलफिन्स्टन महाविद्यालयातून पदवी, चर्चगेटच्या गव्हर्नमेन्ट […]

पाडगावकर, यशोदा

काव्यसुर्य मंगेश पाडगावकर यांच्या सौभाग्यवती यशोदा पाडगावकर यांनी “कुणास्तव कुणीतरी“ हे २००० रोजी प्रकाशित झालेल्या दर्जेदार आत्मचरित्राद्वारे साहित्यचिश्वात ओळख व किर्ती प्राप्त केली. त्यांच्या विलोभनीय लेखनकौशल्यांद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, व त्यांचे पती […]

पुरुषोत्तम शिवराम रेगे (पु. शि. रेगे)

मराठी वाङ्मयविश्वात कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक व संपादक अशी ओळख असलेल्या पु.शी.रेगे उर्फ पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाब येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. पर्यंत […]

1 29 30 31 32 33 57