श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी (पठ्ठे बापूराव)

Patthe, Bapurao

‘वग’, ‘गौळणी’, ‘पदे’, ‘कटाव’, ‘सवालजवाब’ आणि तमाशाचा फड’ यासाठी ज्यांनी एक काळ गाजवला ते श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी तथा पठ्ठे बापूराव.

पठ्ठे बापूरावांचा जन्म ११ नोव्हेंबर १८६६ रोजी सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात हरणाक्ष रेठरे या गावी झाला. औंधच्या महाराजांच्या आश्रयाखाली इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर गावचे कुळकर्णीपण व जोशीपण त्यांच्याकडे आले. परंतु लहानपणापासूनच त्यांना कवने करण्याचा छंद होता.

वग, गौळणी, पदे, कटाव, झगड्याच्या लावण्या, भेदिक लावण्या असे सारे प्रकार हाताळणार्‍या बापूरावांच्या लावण्यांची संख्या दोन लाख असल्याचे म्हटले जाते, परंतु पुस्तकरुपाने त्यांच्या फार कमी रचना आज उपलब्ध आहेत, त्याही विविध संकलनवजा संग्रहांमधूनच.

गावातील एका तमाशाच्या फडासाठी त्यांनी लावण्या रचल्या आणि त्या फडाबरोबर तमाशातून गावोगावी पोहोचल्या त्यामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यानंतर व्यवसाय व संसार सोडून त्यांनी स्वतःचा एक फड उभा केला आणि स्वरचित लावण्या पठ्ठे बापूराव या नावाने ते स्वतः गाऊ लागले. गण, गौळण भेदिक’, ‘रंगबाजीच्या, झगड्याचा अशा विविधरंगी लावण्या त्यांनी रचल्या. ‘मिठाराणीचा वग’ यासारखी अनेक वगनाट्य लिहिली. ती सर्व महाराष्ट्रभर गाजली. त्यांची रचना लाखांच्या आकड्यात आहे असं म्हणतात. त्यांच्या हयातीत ‘पठ्ठे बापूराव यांच्या लावण्या व गवळणी ः भाग १ ला’ आणि ‘पठ्ठे बापूराव यांच्या ढोलकीवरील दिलखुश लावण्या’ हे दोन संग्रह प्रसिद्ध झाले.

पठ्ठे बापूराव कुळकर्णी यांच्या लावण्या भाग १, २, ३ याही प्रकाशित झाल्या. या भागाला न. चि. केळकर यांचे प्रास्ताविक लाभले आहे. त्यात ते लिहितात, ‘पहिल्या भागातील लावण्या स्वतः पठ्ठे बापूरावांनी निवडून लिहून दिल्या आणि स्वतः प्रूफे तपासली होती.’’ त्यांच्या लेखणीचं वर्णन करताना ते म्हणतात, ‘‘बेपर्वाई असली तरी प्रसंग असेल त्याप्रमाणे ठसकेदार व समर्पक असे शब्द वापरण्याची ढब त्यांच्या लेखणीत होती.

न. चि. केळकरांनी पठ्ठे बापूरावांना ‘शीघ्रकवी’ हा किताब दिला होता. ‘चौदा रत्नांचा जन्म’ ‘ता’ अक्षराची भेदिक लावणी,’ ‘तीन वस्तू ची भेदिक लावणी’ या लावण्यांबरोबरच बापूरावांचे रचनेवरील प्रभुत्व लक्षात येईल अशी ‘मुंबईची लावणी’ अतिशय प्रसिद्ध आहे.

या लावणी सम्राटाचे २२ डिसेंबर १९४५ रोजी निधन झाले.

श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी, म्हणजेच “शाहीर पठ्ठे बापुराव” यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८६६ रोजी झाला.

शाहीर पठ्ठे बापुराव यांचे मराठीसृष्टीवरील लेख

जुने शाहीर पठ्ठे बापूराव (11-Nov-2016)

जुने शाहीर पठ्ठे बापूराव (16-Nov-2017)

शाहीर पठ्ठे बापूराव (22-Dec-2018)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*