अरविंद सावंत

खासदार, माजी केंद्रीय मंत्री

अरविंद गणपत सावंत हे शिवसेनेतील राजकीय नेते आहेत. २०१९ सालापासून ते अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री आणि २०१४ पासून लोकसभेचे सदस्य होते.

११ नोव्हेंबर २०१९ रोजी अरविंद सावंत यांनी , भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

अरविंद सावंत ह्यांचा जन्म ३१ डिसेंबर १९५१ रोजी झाला. त्यांनी भवन्स महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मध्ये अभियंता म्हणून काम करीत होते.

१९६८ मध्ये अरविंद सावंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात गटप्रमुख ह्या पदापासून केली. ह्यावेळी त्यांनी पोलिंग एजंट म्हणून काम केलं. स्थानिक लोकांच्या रोजगारासाठी मागणी करणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समितीत ते सामील झाले.

१९९५ साली त्यांनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मधून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली आणि शिवसेना पक्षात प्रवेश केला. १९९६ साली ते आमदार म्हणून निवडून आले. कौन्सिलमध्ये त्यांनी झोपडपट्टी संबंधित विषय उपस्थित केले , मराठी भाषेला महत्व दिले आणि गिरणी कामगारांना घरं देण्यासाठी मागणी केली. २०१० मध्ये त्यांना पक्षाचे उपनेते व प्रवक्ता पद बहाल करण्यात आले. २०१४ साली त्यांनी मिलिंद देवरा विरोधात दणदणीत विजय मिळवला. त्यावेळी त्यांनी मिलिंद देवरांना १,२०,००० मतांनी मागे टाकून खासदारकीचं पद प्राप्त केलं.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

#Arvind Sawant

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*