अभिनय सावंत

चित्रपट अभिनेता

अभिनय सावंत मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील एक अभिनेता. ह्याचा जन्म ६ डिसेंबर रोजी झाला. तो पहिल्यापासूनच मुंबईकर आहे. त्याचे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले आहे.

अभिनयने ‘ श्रीमंत दामोदर पंत ‘ ह्या चित्रपटापासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे त्याने अकल्पित – एक सत्य कल्पनेपलिकडचे , थापाड्या हे चित्रपट केले.

मालिकासृष्टीत त्याने नकटीच्या लग्नाला यायचं हं ! (झी मराठी) ह्या नावाजलेल्या मालिकेत काम केलं आहे. सध्या तो ‘ नवरी मिळे नवऱ्याला ‘ ह्या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत ‘ उदय आल्हादराव भालेराव ‘ नामक पात्र साकारीत आहे.

अभिनय सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत ह्यांचा मुलगा आहे.

#Abhinay Sawant

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*