मराठी आडनावांचा शोध, संशोधन आणि विचार विवेचन

मराठी आडनावे संग्रहित करण्याचा आणि त्यावर लेख लिहिण्याचा छंद बर्‍याच व्यक्तींना आहे याची जाणीव, वृत्तपत्रातून आणि मासिकातून येणार्‍या लेखावरून होते. नागपूरचे रामगोपाल सोनी यांनी मराठी आडनावावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यांनी १० हजार मराठी आडनावांचा अभ्यास करून, त्यांची व्युत्पत्ती, महत्व, जात, गोत्र, प्रदेश, मूळ ठावठिकाणा आणि नंतरचे स्थलांतर वगैरे माहिती दिली आहे. […]

आडनावाची खरोखर गरज आहे का?

जगभरची कुलनामे म्हणजेच आडनावे रूढ होण्याच्या पध्दती आणि कारणे जवळजवळ सारखीच आहेत. निवास, व्यवसाय, जात, कर्तृत्व, पद, हुद्दा, स्वभाव, सवयी, गुणावगुण, व्यंग वगैरेंमुळे आडनाव पडते किंवा बर्‍याच वेळी ते समाजाकडून किंवा प्रतिष्ठित व्यक्तीकडून त्या कुटुंबावर लादले जाते. […]

आडनावाचीही पसंती हवी

काही मराठी आडनावे इतकी विचित्र आणि लाजिरवाणी असतात की, ती, त्या कुटुंबांनी का स्वीकारली, कोणत्या कारणामुळे रूढ झाली आणि पिढ्यानपिढ्या कशी वापरात ठेवली हे फार मोठे गूढ आहे. अशी आडनावे धारण करून समाजात वावरणार्‍या मुला-मुलींना विशेषतः विद्यार्थी/विद्यार्थीनींना आणि लेकी-सुनांना टीका, निंदा, हेटाळणी आणि टिंगल यांना सतत तोंड द्यावे लागते, मनस्ताप सहन करावा लागतो अशी अडचणीची आडनावे बदलण्याची आवश्यकता आहे. ती आडनावे बदलून घ्यावीशी वाटण्याची प्रेरणा समाजात रुजली पाहिजे. समाजासाठी आडनाव धारण करून, समाजात वावरावयाचे असल्याने, विक्षिप्त आडनावे हा सामाजिक कलंक आहे असे मी मानतो आणि तो पुसण्यासाठी, धुवून काढण्यासाठी पुरोगामी बदलत्या दृष्टीकोनातून उपाय योजायला हवेत, प्रयत्न करायला हवेत. कायदेशीररित्या नावात/आडनावांत बदल करून घेणे हा प्रमुख आणि प्रभावी उपाय आहे. […]

आडनावाची गरज : व्यक्तीची अचूक ओळख

समाजात, आडनावामुळे तो विशिष्ट कुटुंबगट ओळखला जातो. आडनावामुळे त्या कुटुंबातील व्यक्तीच्या आनुवंशिक स्वभाववैशिष्ठ्यांची आणि गुणावगुणांचीही ओळख पटते. विवाह जुळवितांना या माहितीचा फार अुपयोग होतो. […]

मराठी आडनावे कोश : सुरूवात आणि कार्यपध्दती

मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांची, अक्षरानुक्रमे यादी, 3 मे 1963 पासून, म्हणजे माझ्या 30 व्या वाढदिवसापासून, एका डायरीत लिहीण्यास सुरूवात केली. हीच मराठी आडनावकोशाची सुरूवात. ऑगस्ट 1970 पर्यंत 6 हजार, नोव्हेंबर 1972 पर्यंत 8 हजार तर 1973 च्या जून महिन्यापर्यंत जवळजवळ 10 हजार आडनावे जमा झाली होती. सध्या हा आकडा 60 हजारापर्यंत पोचला आहे. […]

जात म्हणजे काय? ….. बदलता दृष्टीकोन

तुमचा वंश, तुमचं कुळ यालाच तुमची ‘जात’ असं म्हटलं जातं. जी जात नाही ती ‘जात’ असंही म्हणतात. भारतात, जातीसंस्था ही फार पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. वर्ण आणि जाती या संकल्पना, वास्तविक चांगल्या अुद्देशानं समाजात रूढ झाल्या. जन्मत:च तुम्ही आपल्या बरोबर जे जे गुणावगुण घेअून येता ते तुमचं ‘जात’ (तुमची ‘जात’ नव्हे). जन या संस्कृत क्रियापदापासून जनन, जनता, जन्म, जात हे शब्द आले आहेत. […]

गाढवेंचे झाले तारळेकर

कवी यशवंत अुर्फ पेण्ढरकर ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ या संस्थेत नोकरीला होते. त्या संस्थेत ‘गाढवे’ या आडनावाचे अेक शिक्षक होते. विद्यार्थी त्या आडनावाची खूप चेष्टा करायचे म्हणून पेण्ढरकरांच्या मदतीनं त्या शिक्षकानं ‘गाढवे’ हे आडनाव […]

आडनावांच्या नवलकथा – पठ्ठे बापूराव

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लावणीला अढळ स्थान आहे. लावणी गाता येणार नाही, लावणी नाच करता येणार नाही पण लावणीच्या गाण्यावर लावण्यवती नाचतांना पाहतांना मात्र भान हरपते. पठ्ठे बापूराव यांनी लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या काळी लावणीच्या […]

आडनावांच्या नवलकथा – पेण्ढरकर

राजकवी यशवंत यांचं हे आडनाव आहे. बरेच वेळा ते ‘पेंढारकर’ असं लिहिलं किंवा अुच्चारलं जातं. ‘पेंढारे’ या गावाला ‘कर’ जोडून हे आडनांव तयार झालं असावं असा प्रथम दर्शनी समज होतो. ‘पेण्ढरकर’ या आडनावावरून राजकवी यशवंत […]

आडनावाचा वारसा – भाग २

प्रत्येक व्यक्तीचं, बारशाच्या दिवशी, पाळण्यात घालून ठेवलेलं असं अेक स्वत:चं नाव असतं. बव्हंशी स्त्रियांना, लग्नानंतर, नवर्‍याच्या आवडीचं आणखी अेक नाव ठेवलं जातं. म्हणजे लग्नानंतर, तिचं आडनाव आणि नावही बदलल्यामुळं, तिची लग्नापूर्वीची ओळख म्हणजे आयडेन्टीटी पूर्णतया […]

1 2 3 4 5