खटकणारी आडनावं – संशोधनास भरपूर संधी

कुटुंबाला आणि पर्यायानं व्यक्तीला, आडनाव … म्हणजे कुलनाम, फॅमिली नेम, सरनेम, लास्ट नेम .. असतंच असतं. ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचं साधर्म्य दाखविण्यासाठी, कुटुंबाच्या आडनावाची प्रथा मुळात सुरू […]

खटकणारी मराठी आडनावं बदलण्याचे मार्ग

कुणाला वडिलोपार्जित मालमत्ता भरपूर मिळते तर कुणाला काहीच मिळत नाही. पण आडनावाचा वारसा मात्र नको असला तरी मिळतो. आडनाव कसंही असलं तरी ते जन्मभर आपल्या नावासमोर लावावंच लागतं. काही आडनावं भारदस्त असतात तर काही लाजिरवाणी […]

मराठी आडनावं – माअी

काही मराठी आडनावं अशी आहेत की ती आडनावं आहेत यावर विश्वासच बसत नाही. काही व्यक्तीनावंही आडनावं असतात. वसंत, दशरथ, मनोहर वगैरे. माअी हे आदरयुक्त स्त्रीलिंगी टोपण नाव आहे. या नावाचीच ही नवलकथा ….. माझे काका […]

मराठी आडनाव – शब्दी-महाशब्दी

आडनावांच्या गमतीजमतींनी मराठी लेखकांना अतकी भुरळ पाडली आहे की, दोनतीन महिन्यात, कोणत्यातरी प्रसारमाध्यमात, कुणीतरी अेखादा लेख लिहीलेला आढळतो. त्यावरून असे लक्षात येते की ह्या गमती जमतींचे गमतीदार वर्गीकरणदेखील करता येते. प्रसंगांशी सुसंगत किवा विसंगत आडनावे […]

मराठी आडनाव – बोंबला

भुसावळजवळील, वरणगाव येथे माझी आत्या राहते. त्या कुटुंबाला, अहिल्याबाआी होळकरांच्या काळापासून अेका मंदिराची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंदिराचा खर्च भागविण्यासाठी, थोडी शेतजमीनही देण्यात आली आहे. जमीन कसण्यासाठी ती अेका कुळाला देण्यात आली. कुळकायदा […]

आडनावाची खरोखर गरज आहे का ?

आडनावाची खरोखर गरज आहे का? आडनावे काय सांगतात? आडनाव सोडले तर काय बिघडते? विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे? सासरचे? की माहेरचे आडनाव सोडूच नये? की सासर-माहेरचे जोड आडनाव धारण करावे? कुलनाम, आडनाव, सरनेम, फॅमिली नेम, […]

मराठी आडनाव – भुरचंडी

माधव महादेव भुरचंडी, हे नाव, माझे मित्र श्री. ठोंबरे यांनी, सप्टेंबर 1982 मधे मला सांगितलं. त्याच बरोबर, भुरचंडी या आडनावाची कुळकथाही सांगितली. माझ्या आडनावकोशात अशी नोंद आहे. माणसाच्या स्वभावाच्या किंवा शरीराच्या गुणवगुणावरून अनेक आडनावं रूढ […]

मराठी आडनावे – रामनामे आणि मजली

भाभा अणुसंशोधन केन्द्रातील, अेक संशोधनाधिकारी, अशोक भिमाजी मजली या तरूणानं, त्यांच्या ‘मजली’ या आडनावाची कुळकथा सांगितली ती अशी :: त्याचं पूर्वीचं आडनाव ‘रामनामे’ असं होतं. खरं म्हणजे त्यापूर्वीचं आडनाव निराळंच होतं. कराडच्या आसपासच्या परिसरात त्यांचं […]

निवासदर्शक आडनावं – लेवेनहूक.

निवासदर्शक आडनावं रूढ होणं ही जगभराच्या आडनावांची प्रथा आहे. अँन्टोनी वॅन लेवेनहूक (Antoni Van Leeuwenhock, 1632-1723) या डच शास्त्रज्ञानं, लाल रक्तपेशी, अन्नपदार्थातील .. प्राण्यांच्या लाळेतील .. मानवी विष्ठेतील … सूक्ष्मजीवजंतू, साठलेल्या पाण्यातील सूक्ष्म प्राणी (protists), […]

मराठी आडनाव – गुळदगड.

गुळदगड हे आडनाव अैकल्याबरोबर आपल्या मनात विचार येतो की, या कुटुंबाचा, दगडासारख्या गुळाशी काहीतरी संबंध असावा. वैशिष्ठ्यपूर्ण किंवा विचित्र आडनावासंबंधी आपण असाच सरळसरळ संबंध लावतो. परंतू अशा आडनावांच्या कुळकथा वेगळ्याच असतात. त्या, त्या कुटुंबातील व्यक्तीकडून […]

1 2 3 4 5