जगातील दुसर्‍या क्रमांकाची वेधशाळा

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जगातील दुसर्‍या क्रमांकाची हवामान निरीक्षणाची प्रयोगशाळा आहे. ही वेधशाळा इ.स. १९०४ पासून कार्यरत असून या वेधशाळेला आंतराराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून हे शहर समुद्र […]

पिंपरी – चिंचवड : पुण्याचे जुळे शहर

एके काळी पुण्याचे उपनगर मानले जाणारे पिंपरी-चिंचवडची ओळख आता पुण्याचे जुळे शहर अशी करुन दिली जाते. या शहरात फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे. टेल्को, बजाज, फिलिप्स यासारख्या मोठमोठ्या उद्योग समूहांचे येथे कारखाने आहेत. २०११ साली या शहराची लोकसंख्या १७ लाख होती. समुद्रसपाटीपासून ५३० मीटर उंचीवर हे शहर वसलेले आहे.

मुंबईची तहान भागविणारा तानसा तलाव

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराची तहान भागविणारा तानसा तलाव ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहे. येथे सन १८९२ मध्ये जलाशय बांधण्यात आले आहे. येथील अभयारण्यही प्रसिध्द असून वैतरणा (मोडकसागर ) व भातसा हे जलाशय या ठिकाणावरुन जवळच […]

मुंबई शहरात इ.स १८५८ साली बांधलेले भाऊ दाजी लाड संग्रहालय

मुंबई शहरात इ.स १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय स्थापन करण्यात आले. या संग्रहालयास व्हिक्टोरिया राणीचे नाव देण्यात आले. […]

पैठण – दक्षिण काशी

औरंगाबादपासून ५० कि.मी अंतरावर गोदावरी नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या पैठण या शहराला हजारो वर्षाचा इतिहास आहे. पैठण पूर्वी सातवाहन राजांची राजधानी होती. वैशिष्ट्यपूर्ण पैठणी साडी, संत एकनाथांची समाधी यासाठी हे शहर प्रसिध्द आहे. प्राचीन काळापासून ते दक्षिण […]

महात्मा फुले कृषी विद्यापीठ

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी हे तालुक्याचे ठिकाण असून, मुळा नदीच्या काठी वसले आहे. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने संशोधित केलेल्या अनेक पिकांच्या जाती महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण ६८ टक्के आहे. […]

ऐतिहासिक सातारा शहर

सातारा हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मीटर उंचीवर कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या शहराभोवती असलेल्या सात टेकडयांमुळेच या शहराला सातारा असे नाव पडलेले आहे. हे शहर मराठी साम्राज्याच्या राजधानीचे शहर म्हणून इतिहासात […]

मो.ग. रांगणेकरांचे जन्मस्थळ – ठाणे

ज्येष्ठ साहित्यिक मो.ग रांगणेकर यांचा जन्म ठाणे शहरात झाला. १९६७ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सत्यकथा या प्रसिध्द मासिकाचे ते काही काळ संपादक होते. त्यांनी सन १९४१ साली नाट्य […]

अकोला जिल्ह्याचा इतिहास

निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात -१९ व्या शतकात – बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती. कोणत्याही गावाच्या नावाशी एखादी घटना, कथा-दंतकथा किंवा […]

अकोला जिल्ह्यातील दळणवळण सोयी

अकोला जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे सर्वत्र पसरले असून हाजीरा- धुळे – कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जिल्ह्यातून जातो. मुंबई-कोलकाता हा लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. मूर्तिजापूर हे या मार्गावरील प्रमुख जंक्शन आहे. जिल्ह्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे […]

1 44 45 46 47