नंदुरबार जिल्हा

दि. १ जुलै, १९९८ रोजी धुळे जिल्ह्याची विभागणी करून नंदूरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आदिवासींची म्हणजेच अनुसूचित जमातींची जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा हा आदिवासी जिल्हा या नावानेही ओळखला जातो. मराठीची वैशिष्ट्यपूर्ण बोली अहिराणी भाषा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. मिरची व तूरडाळीसाठी महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या या जिल्ह्यात कांदा, कापूस, ऊस, केळी व बोर यांचे उत्पादनही बर्‍याच प्रमाणात घेतले जाते.