मुक्ताईनगरचे मुक्ताबाई मंदिर

Muktabai Mandir at Muktainagar

मुक्ताईनगर हे जळगाव जिल्ह्यातील एक छोटे शहर असून येथे तालुका मुख्यालय आहे.

याच शहरात संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई यांची तापी नदीच्या किनार्‍यावर समाधी आहे. मुक्ताबाईच्या नावावरुनच या शहराचे नाव पडलेले आहे. येथील मुक्ताबाई मंदिर, तुळजाभवानी मंदिर, श्रावणबाळ समाधी मंदिर प्रेक्षणीय आहेत.