माँटेनिग्रो

माँटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. माँटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही माँटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

१९९१ सालापर्यंत माँटेनिग्रो हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलुन सर्बिया व माँटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ३ जून २००६ रोजी माँटेनिग्रो आणि सर्बिया हे दोन देश वेगळे झाले.

राजधानी व सर्वात मोठे शहर :पॉडगोरिका
अधिकृत भाषा :माँटेनिग्रिन, सर्बियन, बॉस्नियन, आल्बेनियन व क्रोएशियन
राष्ट्रीय चलन :युरो

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*