कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत. एरवी बाजारात दिसणाऱ्या जांभळापेक्षा लहान आकारातली ही जांभळे खूप गोड आणि चविष्ट असतात. पानांच्या कोनमध्ये त्यांचे सौंदर्यही लोभस वाटते. जांभळाच्या सरबताची चवही समुद्र किनाऱ्यावरील स्टॉल्समध्ये घेता येते. मात्र ताज्या जांभळाची चव काही निराळीच…
फळांच्या विविध फोटोंनी तोडाला पाणी सुटले…