इंडोनेशियातील मध्य जावा येथील बोरोबुदूर हे जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर आहे. या मंदिरात २६७३ कोरीव चित्रे व ५०४ बौध्द मूर्ती आहेत. मुख्य स्तुपाभोवती ७२ बौध्दमूर्ती आहेत.
शैलेंद्र राजाच्या राजवटीत ९ व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. ११८ चौरस मीटर जागेवर याची बांधणी करण्यात आली आहे.
१९९१ मध्ये या मंदिराची युनेस्को च्या जागतिक वारसा यादीत नोंद झाली आहे.
या मंदिराच्या बांधकामावर भारतातील गुप्त शैलीचाही प्रभाव आढळतो.
Leave a Reply