ऑस्ट्रिया

ऑस्ट्रिया (अधिकृत नाव: जर्मन: Österreich, मराठी: ऑस्ट्रियाचे प्रजासत्ताक) हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेस जर्मनी व चेक प्रजासत्ताक, पूर्वेस स्लोव्हाकिया व हंगेरी, दक्षिणेस स्लोव्हेनिया व इटली तर पश्चिमेस स्वित्झर्लंड व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. व्हिएन्ना ही ऑस्ट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. प्रामुख्याने आल्प्स पर्वतरांगेमध्ये वसलेल्या ऑस्ट्रियाचा मोठा भूभाग डोंगराळ स्वरुपाचा असून ६८ टक्के भूभाग समुद्रसपाटीहून ५०० मी व अधिक उंचीवर स्थित आहे. जर्मन ही ऑस्ट्रियाची राष्ट्रभाषा आहे.

ऐतिहासिक काळापासून युरोपाच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे स्थान असलेला ऑस्ट्रिया बहुतेक सर्व मोठ्या युद्धांना सामोरा गेला आहे. मध्य युगत पवित्र रोमन साम्राज्यचा भाग राहिलेल्या ऑस्ट्रियावर हाब्सबुर्ग राजघराण्याची सत्ता होती. प्रोटेस्टंट सुधारणांनंतर ऑस्ट्रियामध्ये प्रोटेस्टंट पंथ झपाट्याने लोकप्रिय झाला. तीस वर्षांचे युद्ध प्रमुख्याने मध्य युरोपातच लढले गेले. १७व्या व १८व्या शतकांदरम्यान ऑस्ट्रिया युरोपातील सर्वात बलाढ्य राष्ट्रांपैकी एक होता. १८०४ साली फ्रान्समध्ये झालेल्या नेपोलियनच्या राज्याभिषेकाला शह देण्यासाठी ऑस्ट्रियन साम्राज्यची स्थापना करण्यात आली. ह्याचदरम्यान जर्मनीमध्ये प्रशियाचे राजतंत्र देखील बलशाली बनले होते. जर्मन-भाषिक राष्ट्रांवरील वर्चस्वासाठी १८६६ साली ऑस्ट्रो-प्रशियन युद्ध झाले ज्यामध्ये प्रशियाचा विजय झाला. १८६७ साली ऑस्ट्रिया व हंगेरीचे राजतंत्र ह्यांनी ऑस्ट्रिया-हंगेरी ह्या एकत्रित राष्ट्राची निर्मिती केली. ह्यानंतरच्या काळात जर्मन साम्राज्यासोबत ऑस्ट्रियाचे सौदार्हाचे संबंध बनले. इ.स. १९१० च्या पूर्वार्धातील अत्यंत तणावपूर्ण वातावरणादरम्यानच १९१४ साली सारायेव्हो येथे ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड ह्याची हत्या केली गेली. ह्यामुळे खवळून उठलेल्या ऑस्ट्रियाने जर्मन साम्राज्याच्या चिथावणीखाली येऊन सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले ज्याचे रुपांतर झपाट्याने पहिल्या महायुद्धात झाले.

१९१८मधील पराभवानंतर पहिले ऑस्ट्रियन प्रजासत्ताक निर्माण करण्यात आले. ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला ॲडॉल्फ हिटलर १९३४ साली नाझी जर्मनीचा राष्ट्रप्रमुख बनला व १९३८ साली ऑस्ट्रिया जर्मनीमध्ये विलिन (आन्श्लुस) केले गेले. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धानंतर दुसऱ्या व सद्य ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाचा उदय झाला. आजच्या घडीला ऑस्ट्रिया जगातील सर्वात श्रीमंत व सुबत्त देशांपैकी एक मानला जातो.

राजधानी व सर्वात मोठे शहर : व्हियेना
अधिकृत भाषा : जर्मन
इतर प्रमुख भाषा : हंगेरियन, स्लोव्हेनियन, क्रोएशियन
राष्ट्रीय चलन : युरो (EUR)


Austria is a German-speaking country in Central Europe, characterized by mountain villages, baroque architecture, Imperial history and rugged Alpine terrain. Vienna, its Danube River capital, is home to the Schönbrunn and Hofburg palaces. It has counted Mozart, Strauss and Freud among its residents. The country’s other notable regions include the northern Bohemian Forest, Traunsee Lake and eastern hillside vineyards.

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*