बर्किना फासो

बर्किना फासो (फ्रेंच: Burkina Faso) हा पश्चिम आफ्रिकेतील एक भूपरिवेष्टित देश आहे. बर्किना फासोच्या भोवताली माली, बेनिन, टोगो, नायजर, घाना व आयव्हरी कोस्ट हे सहा देश आहेत. वागाडुगू ही बर्किना फासोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ह्या देशाची लोकसंख्या १.५ कोटी इतकी होती.

१९व्या शतकापासून फ्रेंच पश्चिम आफ्रिका ह्या फ्रान्सच्या वसाहतीचा भाग असलेल्या बर्किना फासोला १९६० साली स्वातंत्र्य मिळाले व १९८४ सालापर्यंत तो अप्पर व्होल्टाचे प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. १९८४ साली राष्ट्राध्यक्ष थॉमस संकराने देशाचे नाव बदलून बर्किना फासो असे ठेवले. १९८७ सालच्या एका लष्करी बंडामध्ये संकाराची सत्ता उलथवून ब्लेस कोंपाओरे राष्ट्राध्यक्षपदावर आला व तो आजवर ह्या पदावर आहे.

इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे बर्किना फासो गरीब व अविकसित आहे. दरडोई उत्पनामध्ये बर्किना फासो जगात सर्वांत खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. बर्किना फासोचा मानवी विकास सूचक जगात खालून दुसर्‍या क्रमांकावर आहे.

४ ऑगस्ट १९८४ रोजी त्याचे बुर्किना फासो असे नामकरण करण्यात आले. या देशाच्या शेजारी टोगो, माली व घाना हे देश आहेत. हा देश ५ ऑगस्ट १९६० रोजी फ्रान्सच्या ताब्यातून स्वतंत्र झाला.

बुर्किना फासो या शब्दाचा अर्थ नम्र लोकांची भूमी असा होतो. या देशात वेस्ट अफ्रिकन सीएफए फ्रँक हे चलन वापरले जाते.

राजधानी व सर्वात मोठे शहर : वागाडुगू
अधिकृत भाषा : फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस : ५ ऑगस्ट १९६० फ्रान्सपासून
राष्ट्रीय चलन : पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक


Burkina Faso is a landlocked country in West Africa. It covers an area of around 274,200 square kilometres and is surrounded by six countries: Mali to the north; Niger to the east; Benin to the southeast; Togo and Ghana to the south; and Ivory Coast to the southwest. In 2017, its population was estimated at just over 20 million.Burkina Faso is a francophone country, with French as the official language of government and business. Formerly called the Republic of Upper Volta (1958–1984), the country was renamed “Burkina Faso” on 4 August 1984 by then-President Thomas Sankara. Its citizens are known as Burkinabé . Its capital is Ouagadougou.

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*