1520

जीवनात मागे बघाल तर, अनुभव मिळेल.. जीवनात पुढे बघाल तर, आशा मिळेल..… इकडे -तिकडे बघाल तर,  सत्य मिळेल… आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर, आत्मविश्वास मिळेल…

1284

अनेक वेश व अनेक आश्रम आहेत. पण या सर्वांचे मूळ गृहस्थाश्रमातच आहे. त्रैल्योकातील सर्व प्राणी येथे विश्रांती पावतात. देव, ऋषी, मुनी, योनी, वैराग्यवंत तपस्वी, अतीत, अभ्यागत ज्यांचा गृहस्थाश्रमात भाग आहे असे गृहस्थाश्रमातच उत्पन्न होतात. — […]

1278

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंची राख माणसाच्या अंगचे तेज नाहिसे करते. आपण जर ही राख झटकून तेजस्वी बनलो तर सर्व प्रकारची क्षमता अंगी येऊ शकते. अशी राख जीवनावर साचू न देणे म्हणजेच […]

1281

विजांचा कडकडाट आणि मेघांचा गडगडाट चालू असताना आकाशाकडे डोळे लावून बसणार्‍या आणि मेघातून पडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणार्‍या चातकाप्रमाणे माणसाची निष्ठा असायला हवी. तरच ध्येय साध्य होण्यास मदत होईल. — स्वामी विवेकानंद

1274

ग्रंथ वाचनाने अज्ञानातील “हीण” काढले जाते. त्याचे बावनकशी सुवर्णात रुपांतर होते. अज्ञानाच्या खोल दशेतून वर यायला मदत होते. त्यातून ज्ञनाची नवनवीन क्षितिजे उजळतात आणि ज्ञानदेवांचे बोट धरुन चालायला लावतात. –दुर्गा भागवत

1270

वागताना आधी आचार सांभाळावा व मग मन निर्मळ होऊन विचार पाहावा. आचार व विचार या दोहोंच्या साह्याने भवसमुद्राचे पैलतीर गाठावे. जे अशा नियमाने चालणार्‍यास कळत नाही ते बाष्कळाला कसे कळेल? — समर्थ रामदास स्वामी

1268

तुम्ही प्रामाणिकपणे भरपूर कष्ट करा. त्यापासून आत्मिक समाधान मिळेल आणि सर्वांप्रति असलेली कर्तव्यपूर्तता सुरु केली की त्यापासून आनंदाची प्राप्ती होईल. सर्व आयुष्यच उजळून निघेल. — स्वामी विवेकानंद

v-329

मानवी जन्म मिळणे ही ईश्वराची देणगी आहे. या जन्मात मिळालेल्या बुद्धीचा, विचारांचा उपयोग करुन चांगले कर्म करा आणि   जन्माचे सार्थक करा ! -संत गाडगेबाबा

v-328

यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो…

v-327

वेदांची अक्षरे पोथीत सापडतात, अर्थ जीवनात शोधायचा असतो. — आचार्य विनोबा भावे

1 2 3 4 5 15