v-326

विद्येचा आणि सत्याचा शोध करीत असताना विद्यार्थ्याने मुक्त असले पाहिजे. — विनोबा भावे

v-325

प्रत्येकाने आपले जीवन आनंदमय बनविण्याची कला शिका. ही कला इतर सर्व कलांची सम्राज्ञी आहे. — केशव विष्णु बेलसरे

v-324

अविचाराचे काजळ दूर करून विवेकाचा दीप प्रज्वलित करावा. — प्र. न. जोशी

v-323

स्वाभिमानी व्यक्तिला अपकीर्ती मृत्युपेक्षा भयंकर वाटते. — श्रीमद् भगवदगीता

v-322

दुसर्‍याविषयी मनापासून सहानुभूती वाटणे हा दैवी गुण आहे. — मदर तेरेसा

v-321

मानवाचा योग्य सन्मान हे लोकशाही प्रणालीचे पहिले व महत्वाचे लक्षण होय. — डॉ. राधाकृष्णन 

v-320

उत्तम मित्रांचा सहवास, उत्कृष्ट ग्रंथ आणि अंत:करणपूर्वक केलेली प्रार्थना या तीन गोष्टी तुम्हाला त्रैलोक्याचे स्वामित्व देतात की नाही पाहा. — स्वामी रामतीर्थ

v-319

शारीरिक बळापेक्षा बुद्धीचे बळ अधिक, परंतू बुद्धीच्या बळापेक्षाही शुध्द चारित्र्याचे बळ अधिक. — भगिनी निवेदिता

v-318

दैवावर हवाला ठेवून राहतात त्यांचे काम कधीच तडीस जात नाही. — चाणक्य सूत्र

v-317

संपूर्ण निसर्गसृष्टीत एकप्रकारची शिस्तबद्धता आहे, तशीच जीवनातही असणे आवश्यक आहे. — स्पेन्सर

1 2 3 4 5 6 15