v-0007

स्वत:चा विकास करा. ध्यानात ठेवा की, गती आणि वाढ हीच केवळ जिवंतपणाची लक्षणे होत. — स्वामी विवेकानंद

v-0006

आपल्या डोक्यावर दु:खाचा मुकुट घालुन सुख माणसासमोर उभे होते. जो या सुखाचे स्वागत करील त्याला दु:खाचे देखील स्वागत करावेच लागेल. — स्वामी विवेकानंद

v-0005

जगातील चांगल्या गोष्टी आपणाला आमंत्रण देतील अशी वाट बघत बसु नये. आपण त्यांच्याकडे धावत जावे. त्यातच आपले हित आहे. — आचार्य अत्रे

v-0004

निद्रा म्हणजे प्रेमाची माता, निद्रा म्हणजे पृथ्वीवरचे अमृत आहे. जगात निद्रा आहे म्हणून शांती आहे. निद्रा म्हणजे आरोग्यदायिनी देवता. — साने गुरुजी

v-0003

खेळात आपण अनेक गोष्टी शिकतो. लहान-थोर सारे विसरतो. आसक्ती विसरतो. खेळ म्हणजे निष्ठा. खेळ म्हणजे सत्यता. खेळ म्हणजे स्वत:चा विसर. — साने गुरुजी

v-0002

मत्सर आणि अहंकार यांचा त्याग करा. दुसर्‍यासाठी एकोप्याने काम करण्यास शिका, आपल्या देशाला ह्यांचीच मोठी आवश्यकता आहे. — स्वामी विवेकानंद

v-0001

फसवणूक करुन कोणतेही मोठे कार्य होत नसते. प्रेम सत्यनिष्ठा व प्रचंड उत्साह यांच्या द्वारेच महान कार्य होत असतात.  म्हणून आपले पौरुष प्रकट करा. — स्वामी विवेकानंद

1 13 14 15