V-0029

आपल्या जीवनात वसंत फुलविण्याची ज्याची शक्ती आहे त्याला संत म्हणावे. “जीवन तुच्छ आहे, त्याज्य आहे, तिरस्कारणीय आहे, तुझ्यात काहीही नाही.” असे सांगून निरुत्साही करतो तो संत नव्हे. तर ज्याच्या सान्निध्यात शुष्कदेखील हिरवेगार बनते तो संत. […]

V-0028

जो जितका जास्त निस्वार्थ, तितका तो अधिक धार्मिक व शिवाच्या अधिक निकट असतो. आणि एखाद्या स्वार्थी माणसाने झाडून सार्‍या मंदिराचे उंबरठे झिजवले, सार्‍या तीर्थक्षत्राच्या वार्‍या केल्या तरीही तो शिवापासून पुष्कळच दूर असतो. — स्वामी विवेकानंद

V-0027

विजांचा कडकडाट व मेघांचा गडगडाट चालू असता आकाशाकडे डोळे लाऊन बसणार्‍या आणि मेघातून पडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणार्‍या चातकाप्रमाणे माणसाची निष्ठा असायला हवी, तरच ध्येय साध्य होण्यास मदत होते. — स्वामी विवेकानंद

V-0026

अंधार्‍या काळोखाला बाजुला सारुन येणार्‍या तेजस्वी प्रकाशात जी तुम्हाला वेगळीच दृष्टी येते, मन उत्साहित करते आणि मांगल्याचे क्षण तुमच्या आयुष्यात घेऊन येते अशा पणतीसाठी, दिव्यासाठी कृतज्ञता व्यक्त करुन दिवाळीच्या निमित्ताने तिचे स्वागत करु! — पं. […]

V-0025

स्वत: जळत अंधाराला नष्ट करणारी पणतीची ज्योत पाहिली की तिच्या तेजाने कोणाचेही मन प्रसन्न होते. पणतीचा हा संदेश घेऊन दिवाळी येते. अनेकांची मनं स्वत:च्या तेजाने उजळून सर्व विश्वाला सुखी करावे ही प्रेरणा देऊन जाते. — […]

V-0024

हाताच्या पाच बोटांसारखे आपण राहिले पाहिजे. त्यातले कुठलेच बोट दुसर्‍यासारखे नसते. तरीही एखादी वस्तू उचलताना ही पाचही बोटे एकत्र येऊन ती वस्तू उचलतात. खरे तर बोटे पाचच आहेत, पण ती एकत्र येऊन हजारो कामे करतात. […]

V-0023

एखाद्याला क्षमा करणं म्हणजे दुर्बलता किंवा भोळसटपणा नव्हे. क्षमा हे पलायन नसून आक्रमण आहे. ते एक शस्त्र आहे, ज्याला ते पेलता येईल, वापरता येइल, त्याच्यासाठी तर ते एक अमोघ अस्त्र आहे. साम, दाम, दंड, भेद […]

v-0022

मोती होऊन सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक चांगले. — साने गुरुजी

V-0021

नम्रता हा ज्ञानाचा खरा आरंभ आहे. गुरुजवळ शिष्य रिकामे मन घेऊन जातो. विहिरीत अपरंपार पाणी आहे, पण भांडे जर वाकणार नसेल, तर त्यात पाण्याचा एक थेंबही येणार नाही, शिरणार नाही. ज्ञानाचे जे सागर असतात, त्यांच्याजवळ […]

V-0020

नि:स्वार्थपणामुळे खरोखर अधिक लाभ होतो. पण लोकांना हा गुण अंगी बाणवण्यासाठी अभ्यास करण्याचा धीर नसतो एव्हढेच. — स्वामी विवेकानंद

1 11 12 13 14 15