बोधकथा

गरुडाच्या पंखांचा बाण

गरुडाच्या पंखांचा बाण

गरुड पक्षी एका उंच कड्यावर ससा टेहळीत असता, एका पारध्याने त्याला पाहिले व अचूक नेम धरून बाण सोडला. तो बाण गरुडाच्या छातीला लागून तो अगदी मरायला टेकला. मरता मरता शरीरात घुसलेल्या बाणाकडे त्याने पाहिले तो त्या बाणांचा पिसारा गरुडाची पिसे लावून केला होता असे त्याला दिसले. तेव्हा तो म्हणाला, 'माझ्या ... >>>

भाषासौंदर्य

वसतिगृहाकडे परत येताना त्यांना अंधारातूनच यावं लागलं. त्याच अंधारातून वाट काढत तो तत्त्वज्ञानाच्या वर्गात जाऊन बसला. त्या कक्षात मशाली तेवत होत्या. अंधारातून वाटचाल करून आल्यामुळं त्याला मशालींचा तो प्रकाश पाहून बरं वाटलं. योगायोगाची गोष्ट अशी की, त्या वर्गाला आचार्य प्रकाशाविषयीच सांगत होते, ‘प्रकाशात काम करणार्या माणसाला त्या प्रकाशाचं जाणीवपूर्वक भान ... >>>

वचनामृत

v-325

प्रत्येकाने आपले जीवन आनंदमय बनविण्याची कला शिका. ही कला इतर सर्व कलांची सम्राज्ञी आहे.

— केशव विष्णु बेलसरे

Jokes

सदाशिव पेठेतील कुलकर्ण्यांच्या पेट्रोल पंपावर :
  पुणेकर : ५ रू.चे पेट्रोल टाक रे..
  कर्मचारी(आश्चर्याने) : अरे बापरे…एवढे पेट्रोल टाकून कुठे दौरा आहे साहेबांचा ?
  पुणेकर : कुठे दौरा वगैरे नाही? मनात आलं कि असेच पैसे उधळतो मी.
  कर्मचारी जागेवर बेशुद्ध