आपल्यापेक्षा कोणी ना कोणी श्रेष्ठ असतेच

एखादा कलावंत असतो. तो आपल्या कलेत तरबेज होतो. लोकांची वाहवा, तोंडभरून स्तुती मिळवितो. एवढ्या स्तुनीने गर्व वाढतो. आपल्या पेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही ही भावना वाढीस लागते. पण वास्तव वेगळेच असते. अंधार होताच काजवे चमकायला लागतात. त्यांना वाटतं पृथ्वीवरचा अंधार आम्हीच उजळून टाकला आहे. या अंधारात आमच्या इतके तेजस्वी आम्हीच. रात्र होताच तारे चमकू लागतात. ते पाहून आपल्यापेक्षा कुणीतरी अजून तेजस्वी आहे हे काजव्यांना कळतं. आता तारे आपल्या तेजाने झगमगत असतात. काही वेळाने चंद्रोदय होतो आणि त्याच्यासमोर तार्‍यांचे तेज फिके पडते. मग चंद्रालाही गर्व होतो की माझ्या प्रकाशानेच पृथ्वी उजळून निघते. या भ्रमात तो काही तास असतो तोच अरुणोदय होतो. चंद्राचा प्रकाश लुप्त होतो. आणि सूर्योदय होतो. स्वयंप्रकाशी तळपणारा असा सूर्य एकमेव, एखादाच !
तात्पर्य – आपल्यापेक्षा कोणी ना कोणी श्रेष्ठ असतेच.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.