क्वीन ऑफ पुडिंग

साहित्य : 6-7 ब्रेड स्लाइस, मऊ बटर, 3 अंडी, अर्धा लिटर दूध, चवीला साखर, मार्मालेड (संत्र्याचा जॅम)

कृती : अंड्यातला पिवळा-पांढरा बलक वेगळा करा. पिवळा भाग, साखर व दुधाचे कस्टर्ड बनवा. ब्रेडला बटर लावून बेकिंग डिशमध्ये व्यवस्थित रचा. त्यावर कस्टर्ड घाला. त्यावर लिंबाची किसलेली साले पेरा. मार्मालेड किंवा लाल जॅम पसरा. शेवटी अंड्याचा पांढरा बलक थोड्या साखरेबरोबर घट्ट होईपर्यंत फेसा, पुडिंगवर ओता. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 15 मिनिटे भाजा. पांढरा बलक सोनेरी झाला पाहिजे. थंडीत गरम सर्व्ह करा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 612 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*