आमटीसाठी साहित्य : 1 वाटी तूरडाळ, 2 चमचे चिंचेचा कोळ, कोथिंबीर.
फोडणीसाठी लागणारी सामग्री: कडीपत्ता, 2 चमचे तेल.
फळे बनविण्यासाठी लागणारे साहित्य : १ वाटी ज्वारीचे पीठ, २ चमचे डाळीचे पीठ, हळद, हिंग ,मिरची कोथिंबीर पेस्ट, पांढरे तीळ.
कृती :
१. कढईमध्ये तेल घालून ,जिरे ,मोहरी, हिंग,हळद घालून घ्यावी.
२. त्यात कडीपत्ता..कोथिंबीर मिरची पेस्ट घालावी
३. शिजवलेले वरण घालुन घ्यावे
४. एक उकळी आल्यावर चिंचेचा कोळ घालून घ्यावा
५. चवीपुरते मीठ घालावे
तयार केलेले फळ घालावी व चांगले उकळून घ्यावे
फळ बनविण्याची कृती:
१. ज्वारीच्या पिठात तिखट ,मीठ , हळद ,थोडे तीळ कोथिंबीर , आवडत असेल तर पालेभाजी ही घालू शकतो ..
२. पीठ मळून झाल्यावर लांबट गोल आकार देऊन पुन्हा एकदा तिळात घोळवावा..
३. इडली कुकर अथवा कुकर मध्ये थाळीला तेल लावून वाफवून घ्यावे .
४. पूर्ण वाफ जाऊ द्यावी मग गोल वड्या पाडाव्यात . आणि तयार केलेल्या वड्या आमटीत घालून छान उकळी आणा
वरती तूप घालून सर्व्ह करा ..
५. वरणफळ ऐवजी त्या वड्या तळून खाऊ ही शकता..
Leave a Reply