पिंपळे, मिनार

मिनार पिंपळे यांनी त्यांच बी. एस. डब्ल्यू. व एम. एस. डब्ल्यू चं शिक्षण चर्चगेटमधील निर्मला निकेतन या कॉलेजमध्ये पुर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांना झोपडपट्यांमधील रहिवाश्यांसाठी काहीतरी भव्य, चांगले काम करण्याची मनी प्रचंड हुरहूर होती. पदव्योत्तर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी युवा या संघटनेची स्थापना केली. मुंबईमधील झोपडपट्टयांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपाय योजना सुचवल्या व प्रत्यक्ष अंमलात सुध्दा आणल्या. परंतु या योजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी स्थानिक बेरोजगार तरूणांची मदत घेतली. त्यांच्याशी जिव्हाळ्याच नात निर्माण करून त्यांना संघटित केलं. आज त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व इतक्या वर्षांच्या साधनेमुळे आज अनेक झोपडपट्टयांमध्ये धडाडीच्या तरूणांची पथके उभी राहिली आहेत. हे तरूण स्वतःच या वस्त्यांच्या विकासासाठी अनेक उपाय योजना राबवीत आहेत. त्यांच्या बाहुंना बळ व पाठीला कणा देण्याचे काम मात्र युवाचे स्वयंसेवक करीत आहेत. अनेक तरूणांना गुन्हेगारी मार्गांपासून परावृत्त करून समाजाच्या आदर्श पुर्नरचनेसाठी त्यांना मानसिक व शारिरीक खाद्य पुरविण्यात या संघटनेचा मोलाचा वाटा आहे
[…]