घोरपडे, अभिजित
अभिजीत घोरपडे हा निसर्गाविषयी अभिरूची असलेला एक तरूण पत्रकार, निसर्गतज्ञ, व हवामानाचे अचूक मोजमापन व त्यांसंबंधीचे शास्त्रीय विश्लेषण लोकसत्ता वृत्तपत्राद्वारे वाचकांपर्यंत सोप्या शैलीत पोहोचविणारा लेखक आहे. जीवनात आतापर्यंत कितीतरी बहुआयामी कामे त्याने केलेली आहेत. काही त्याच्यामधील आभ्यासु विद्यार्थ्याला वाव देणारी, काही त्याच्यामधील प्रतिभावंत कलाकाराला न्याय देणारी तर काही त्यांच्या मधील चळवळ्या समाजसेवकाला अधिक परिपुर्ण बनविणारी. अभिजीत घोरपडे हा अतिशय दक्ष व सतत डोळ्यात तेल घालून सामाजिक अस्मितेचे रक्षण करणारा धडाडीचा पत्रकार असण्याबरोबरच तो त्याला शाहारून टाकणार्या सूंदर पक्ष्यांचा, प्राण्यांचा व नद्यांचा सच्चा मित्रदेखील आहे. […]
