मराठे, उषा (उषाकिरण)
उषा मराठे हे मूळ नाव असणार्या उषाकिरण यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी वसईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. उषाकिरण आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोन्ही मुलींना नाटकांत काम करण्यासाठी पाठवावयाचे ठरवले. […]
