दाभोलकर, (डॉ.) नरेंद्र

अंधश्रध्दा निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून “महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती” ही संघटना स्थापन करणारे बुध्दीवंत, विज्ञाननिष्ठ आणि साहित्यिक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला.
[…]

काळे, वसंत पुरुषोत्तम (व.पु. काळे)

लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु. काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे,हे पेशाने वास्तुविशारद होते.
“आपण सारे अर्जुन”, “गुलमोहर”, “गोष्ट हातातली होती!“, “घर हलवलेली माणसे”, “दोस्त”, “माझं माझ्यापाशी?”, “मी माणूस शोधतोय”, “वन फॉर द रोड”, “रंग मनाचे”, “माणसं”,“प्लेझर बाँक्स भाग १ आणि २”, “वपुर्वाई”, “वपुर्झा़”, “ हुंकार” असे पत्रसंग्रह, व्यक्तीचित्रे, ललितप्रकार खुपच प्रसिध्द आहेत.
[…]

कोनकर, शशिकांत

शशीकांत कोनकर ह्यांच्या मते ठाणे हे जणू मुंबईजवळचे पुणे आहे. उद्याच्या ठाण्याकडे पाहताना ते म्हणतात की ते नितांत सुंदर, स्वच्छ व संस्कृती जपणारे असावे. ठाणे विद्येचे माहेरघर आहे असंही ते म्हणतात.
[…]

वैद्य, शंकर

“स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” , “पालखीचे भोई” अशा एकाहून एक सरस तसंच दर्जेदार काव्यरचनांची निर्मिती करणारे प्रसिध्द कवि व साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये १५ जून १९२८ रोजी झाला.
[…]

शंकर नारायण (शन्ना) नवरे

नाटककार, कादंबरीकार, कथाकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले शंकर नारायण नवरे. शंकर नारायण नवरे हे नाव शन्ना म्हणूनच सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. २१ नोव्हेंबर १९२७ रोजी त्यांचा जन्म मुंबईत झाला. […]