सुरेंद्र शांताराम दिघे

जिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक, शिक्षण-क्षेत्र

Surendra Dighe
Surendra Dighe

सुरेंद्र दिघे हे जिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक आहेत.

जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे (Jidnyasa Trust, Thane) ही संस्था १९९२ साली स्थापन झाली. जिद्द-ज्ञान-साहस या चित्रसूत्रांवर आधारित गेले जवळ जवळ २० वर्ष काम करत आहे.

विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन; ज्यमध्ये प्रामुख्याने हिमालय आणि सह्याद्री साहस शिबीरे, जिज्ञासा छात्र सेना, विज्ञान केंद्र, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आणि इतर विज्ञान विषयक उपक्रम, शालेय जिज्ञासा हे शालेय मुलांनी, मुलांसाठी संपादित केलेले वार्षिक नियतकालिक, कला शिबीर, निसर्ग आणि पर्यावरण विषयक विशेष उपक्रम, शिक्षण सक्षमीकरण अभियान यांचा समावेश आहे.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे जिज्ञासाला २००८ साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच जॉन्सन इंटरनॅशनलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, श्री. आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चैत्र नवरात्रोत्सव २००८ साली गौरवचिन्ह प्राप्त झाले. सौ. सुमिता दिघे आणि श्री. सुरेंद्र दिघे यांना ठाणे नगररत्न पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल नवनिर्माण गौरव पुरस्कार मिळाला.

## Surendra Dighe

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*