प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक शाहू मोडक होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी झाला आणि शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला.
शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. जन्माने ख्रिश्चन असूनही शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया केल्या. त्यांनी ज्ञानेश्वतराची भुमीका शब्दशः जगले कारण त्यांनी त्या भुमीकेनंतर मांसाहार वर्ज केला होता. त्यांनी केवळ या भूमिकांमधून केवळ अभिनयच केला नाही तर तो सात्विक भाव त्यांच्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली.
अतिशय सात्त्विक भूमिका साकारणाऱ्या शाहू मोडक यांची प्रत्यक्ष जीवनातील भूमिकाही तेवढीच तेजस्वी होती. रुपेरी पडद्यावर तर शाहूरावांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलेच.
शाहू मोडक आणि प्रतिभाताई जैन यांची ही प्रेम कहाणी एक अदभूत कहाणी आहे. शाहू मोडक हे ख्रिच्शन तर प्रतिभाताई जैन. जैन साध्वीचे व्रत झुगारून प्रतिभाताईंनी शाहू मोडक यांच्याशी लग्न करून एक इतिहास घडविला. शाहू मोडक यांचे ११ मार्च १९९३ रोजी निधन झाले.
शाहू मोडक प्रवास … एका देवमाणसाचा
लेखिका: प्रतिभा शाहू मोडक
अनुवाद: सुधीर गाडगीळ
Leave a Reply