काणे, पांडुरंग वामन (भारतरत्न पां वा. काणे)

Bharatratna Pandurang Vaman Kane alias -PaVa Kane

एका संशोधनपर ग्रंथराजाची निर्मिती करून भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान मिळविणारे ‘महामहोपाध्याय’ पांडुरंग वामन काणे हे कोकणच्या रत्नभूमीतील अनमोल कोहिनूर ठरतात.

७ मे १८८० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पेढे परशुराम या गावी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

लहान वयात त्यांना अमरकोशाचे ४०० श्लोक मुखोद्गत होते. काणे तीक्ष्ण बुद्धीचे आणि एकपाठी होते. लहानपणापासूनच संस्कृत, मराठी आणि इंग्रजी भाषांचा त्यांनी अभ्यास केला.

वयाच्या एकविसाव्या वर्षी बी.ए.ची पदवी घेतलेल्या काणे यांनी १९०२मध्ये वकिली, १९०३मध्ये एम.ए. (संस्कृत) या परीक्षाही उत्तीर्ण केल्या. पुढे तीन वर्षे रत्नागिरीत आणि मुंबईत एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकपदी काम केले.

अवघे ११ वर्षाचे असताना काणे यांचा ‘घोषयात्रा अथवा दुर्योधनबंधन-मोक्षण’ हा पुस्तक परिचयपर दोन पानी लेख ‘महाराष्ट्र कोकिळ’मध्ये प्रसिद्ध झाला, हेच त्यांचे पहिले मराठी लेखन. त्यानंतर त्यांनी इंग्रजीतून जॉइंट ऑथरशीप ऑफ काव्यप्रकाश हा लेख वामनसुत या टोपणनावाने लिहिला.

१९४२ मध्ये त्यांना सर्वमान्य अशी ‘महामहोपाध्याय’ ही पदवी मिळाली. तसेच अलाहाबाद, पुणे विद्यापीठांच्या मानाच्या डी. लिट् या पदव्याही मिळाल्या.

१९४७ मध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काणे यांची नियुक्ती करण्यात आली.

१९३५ मध्ये त्यांची राज्यसभेवर नेमणूक झाली आणि त्याच साली वॉल्टेर येथील भारतीय इतिहास परिषदेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले.

१९६५ मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर १९६३मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च भारतीय सन्मानाने ते गौरविले गेले.

भारतरत्न महामहोपाध्याय पां. वा. काणे यांचे १८ एप्रिल १९७२ रोजी निधन झाले.

## Pandurang Waman Kane

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*