पं. विजय कोपरकर

विजय कोपरकर संगीतातील नावाजलेले व अवघ्या महाराष्ट्राला माहिती असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९६२ रोजी झाला. वडील कीर्तनकार असल्यामुळे,विजय कोपरकर यांच्यावर लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले. वयाच्या आठव्या वर्षापासून गायनाला सुरुवात करून सुरवातीला मधुसूदन पटवर्धन त्यानंतर सुमारे पाच वर्षे डॉ. वसंतराव देशपांडे आणि मग पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे सात वर्षे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतलं.

त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे तू आता फक्त रियाज कर, असे सांगणारी माझी आई ग्रेट आहे, असे आपल्या आईबद्दल सांगतात. बुद्धिमान, व्यासंगी आणि मैफलीचे बादशहा शोभतील अशा दोन गानगुरूंचा सहवास आणि स्वतःचा रियाज, चिंतन यांनी विजय कोपरकर यांनी आपलं गाणं वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. अस्तु या मराठी चित्रपटातील ‘कोहम’ हे संस्कृत भाषेतलं गाणं विजय कोपरकर यांनी गायलं आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*