मराठी अभिनेते दिनेश साळवी

लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक

लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक अशी दिेनेश साळवी यांची ओळख होती.  ते मेनस्ट्रीममधील अभिनेते नसूनही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होति।

अभ्युदय नगरमधून एकांकिका आणि नाटकांमधून दिनेश साळवी यांचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर ते मालिकांमध्ये झळकले. सीआयडी या लोकप्रिय हिंदी मालिकेतही त्यांनी अभिनय केला होता. अभ्युदय नगरचे रहिवासी असल्याने अभिनेता आदेश बांदेकर यांच्यासोबत त्यांचे खास सख्य होते. काही दिवसांपूर्वी आदेश बांदेकरांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही दिनेश सहभागी झाले होते.

सीआयडीसह अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. कॉलेजमधील बऱ्याच एकांकिका देखील त्यांनी बसवल्या.

मालिकांमधून काम करत असूनही एकांकिकांचं दिग्दर्शन, लेखन हा त्यांच्या जवळीचा विषय होता. ‘तुझी चाल तुरू तुरू’ या नाटकातही त्यांनी काम केले आहे.

३० जानेवारी २०१९ रोजी दिनेश साळवी यांचे मुंबई येथे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले.

## Dinesh Salvi

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*