मालती पांडे बर्वे

मराठी चित्रपट संगीत आणि भावगीत गायिका मालती पांडे बर्वे यांचा जन्म १९ एप्रिल १९३० रोजी झाला.

मालती पांडे यांच्या घरात संगीताचे वातावरण होते. लहानपणापासूनच गाण्याच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मालतीबाईनी त्रिवेदी सर व नाशिकचे भास्करराव घोडके यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. किशोरवयातच त्या गाण्याच्या बैठकी करू लागल्या. महाविद्यालयात असताना ”घराबाहेर ”या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले.

त्यामुळे प्रभातच्या ”आगे बढो”साठी सुधीर फडके यांनी मालती बाईना बोलावले. ”वेद मंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मातरम”,”पुढचे पाउल पुढेच टाका”,”त्या तिथे पलीकडे”,हि त्यांची चित्रपटातील गीते खूप गाजली.

कोलंबिया कंपनीने त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. राजा बढे व संजीवनी मराठे यांचे काव्य तर संगीत होते ”गजाननराव वाटवे यांचे. ”ये पिकवू अपुले शेत मंजुळे”,”आला स्वप्नांचा मधुमास” अशी ती दोन गीते होती.

गदिमा यांच्या या गाण्याने सगळ्यांना त्या वेळी वेड लावले होते. त्या गाण्यातील फुलुनी राहणे,चोरा तुझिया मनी चांदणे, चोर ही जाणे चंद्र ही जाणे, केली चोरी खपेल काय, ही कडवी मनाचा ठाव घेतात.

”लपविलेल्या हिरव्या चाफ्याचा गंध ”आजही मनामनात दरवळतो आहे. घरात संगीताचं वातावरण असलं की आपसूकच सुरांचे संस्कार मनावर होत असतात. संगीत वारसा घरातल्या किमान एकाकडे तरी येत असतो तसेच मालती पांडे यांच्या बाबतीत.

गझल, नाटय़गीत, पाश्र्वगायन, लावणी असे सगळेच संगीताचे प्रकार तिच्या आवडीचे आहेत. सिनेमा, मालिकांसोबतच प्रियांका बर्वे ने संगीत नाटकांमध्येही काम करते. राहुल देशपांडे यांच्यासोबत ती ‘मानापमान’, ‘संशयकल्लोळ’ या संगीत नाटकांसाठी ती काम करते.

मालती पांडे यांचे २७ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*