बेर्डे, लक्ष्मीकांत

लक्ष्मीकांत बेर्डे हे हे मराठी रंगभूमी व चित्रपट तसंच हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता होय, त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ ला झाला.लहानपणापासूनच लक्ष्मीजींना विविध कलांची आणि अभिनयाची आवड असल्यामुळे गणेशोत्सवात व इतर सार्वजनिक कार्यक्रमा व महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये भाग घेत आणि त्यामध्ये अनेकवेळा पारितोषिके पटकावली होती. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी १९८३-८४ साली मुंबई मराठी साहित्य संघा सोबत व्यावसाविक अभिनयच्या कारकिर्दीत पाऊल ठेवले,ते म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे यांच्या “टूर टूर” ह्या नाटकातील प्रमुख भूमिकेद्वारे १९८५ साली प्रदर्शित झालेल्या “लेक चालली सासरला” या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत लक्ष्मीकांतजींनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. धुमधडाका, अशी ही बनवाबनवी, थरथराट, धडाकेबाज, माझा छकुला, दे दणादण, हमाल दे धमाल, भुताचा भाऊ, मुंबई ते मॉरिशस, अफलातुन, झपाटलेला, खतरनाक, चल रे लक्ष्या मुंबईला, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, येडा की खुळा, चिकट नवरा, जमलं हो जमलं, रंगात संगत, हसली ती फसली, गडबड घोटाळा हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. सूरज बडजात्या-दिग्दर्शित “मैने प्यार किया” या चित्रपटाद्वारे सलमान खानच्या साथीत त्याने लक्ष्मीकांतजींनी १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे इतर हिंदी चित्रपट म्हणजे साजन, बेटा, हम आपके है कौन, द जंटलमॅन, लो मैं आ गया,शिकार, हम तुम्हारे हैं सनम, हथकडी, तकदीरवाला, मासूम,चाहत. तर मरठी रंगभुमीवर लक्ष्मीकांतजींनी लेले विरूध्द लेले, कार्टी प्रेमात पडली, बिघडले स्वर्गाचे दार,शांतेच कार्ट चालू आहे या नाटकातं वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.
पु.ल देशपांडे यांच्या एक होता विदुषक या चित्रपटात गंभीर स्वरुपाची व्यक्तिरेखा साकारत आपल्या अभिनयाची चित्तवेधकता दाखवून दिली. आपल्या कारकिर्दीत लक्ष्मीकांतजींना अनेक नाटक व चित्रपटांसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तसंच पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आलं होतं; १६ डिसेंबर २००४ किडनीच्या आजारानी लक्ष्मीकांत बेर्डेंचं मुंबईत निधन झालं; त्यांच्या मृत्यूची बातमी म्हणजे रसिकांसाठी व कलाविश्वासाठी हादराच होता कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याकडे पाहिल्यावर कळत नव्हतं की त्यांना आजारकीअसेल व याची पुसटशी कल्पना माध्यमांना देखील नव्हती.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावरील मराटीसृष्टीवरील लेख.

सशक्त अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (9-Nov-2017)

लक्ष्मीकांत बेर्डे (26-Oct-2018)

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (16-Dec-2021)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*